मतदानासाठी स्थानिक सुट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:27 IST2018-02-17T00:27:19+5:302018-02-17T00:27:23+5:30
१६ मार्च ते मे २०१८ मध्ये मुदत संपणाºया व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदांसह सर्व सदस्यपदांसाठी तसेच रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रमामध्ये अंशत: बदल केल्याबाबतचे सुधारित आदेश प्राप्त झाले आहेत.

मतदानासाठी स्थानिक सुट्टी
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : १६ मार्च ते मे २०१८ मध्ये मुदत संपणाºया व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदांसह सर्व सदस्यपदांसाठी तसेच रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रमामध्ये अंशत: बदल केल्याबाबतचे सुधारित आदेश प्राप्त झाले आहेत.
६ फेब्रुवारी १०६५ च्या शासन निर्णयानुसार मतदानाच्या दिवशी निवडणुकीचा कार्यक्रम लागू असलेल्या मतदानाकरिता स्थानिक सुट्टी जाहीर करावी, असे शासनाकडून निर्देश आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत तालुक्यात रिक्त पदाच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी मतदान होणाºया ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात २७ फेब्रुवारी रोजी मंगळवारी मतदान होणार असल्याने सदर दिवशी फक्त संबंधित ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात स्थानिक सुट्टी जाहीर केल्याचे जिल्हाधिकाºयांनी कळविले आहे.