शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

अंग झटकून काम होईना; रंगत चढेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 11:51 PM

निवडणूक आठ दिवसांवर आली तरी अद्याप निवडणुकीचा प्रचार सुरूच झालेला दिसत नाही. वसमत शहरात तर निवडणुकीचे वारेही नाही. पक्षाचे कार्यकर्ते दूर- दूरच दिसतात. अंग झटकून काम करण्याची तयारी कोणीची नाही. दोन्ही प्रमुख उमेदवारांना कार्यकर्त्यांच्याच ओळखी नसल्याने दुरावा स्पष्ट दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : निवडणूक आठ दिवसांवर आली तरी अद्याप निवडणुकीचा प्रचार सुरूच झालेला दिसत नाही. वसमत शहरात तर निवडणुकीचे वारेही नाही. पक्षाचे कार्यकर्ते दूर- दूरच दिसतात. अंग झटकून काम करण्याची तयारी कोणीची नाही. दोन्ही प्रमुख उमेदवारांना कार्यकर्त्यांच्याच ओळखी नसल्याने दुरावा स्पष्ट दिसत आहे.मतदानाचा दिवस जवळ आला तरी अद्याप वसमत तालुक्यात जवळ रंग भरलेला दिसत नाही. प्रचारात दिसावे लागते म्हणून काही जण दिसतात. एवढेच ‘शक्कर’कशी येणार याची वाट पाहणारेही तटस्थ दिसतात. वसमत शहरात तर कार्यकर्ते अजूनही प्रचारात उतरतांना दिसत नाहीत. दोन्ही प्रमुख उमेदवारांना कार्यकर्त्यांची ओळखीच नाहीत. ऐनवेळी उमेदवारीची बक्षिसी मिळालेल्या उमेदवारांना जो समोर येईल, त्याला आपलेसे करण्याशिवाय मार्ग नाही. उमेदवारासाठी जिवाचे रान करील, अशी यंत्रणा मात्र दिसत नाही. कार्यकर्त्यांना सक्षम करण्यासाठी कोणीही काहीच केलेले नाही. त्याचाही राग कार्यकर्त्यांच्या मनात असल्याचे दिसतो.जे सोबत येत आहेत त्याचा जनाधार किती हासुद्धा प्रश्न आहेच, गावागावातील समीकरणे गट- तट याचीही जाणीव नवख्या उमेदवारांना नाही. त्याचाही फटका प्रचाराला बसतो आहे. कार्यकर्त्यांपर्यंतच उमेदवार अजून पोहोचले नाहीत. तर मतदारांपर्यंत कधी पोहोचणार, हा प्रश्न आहे. मतदार मतदान करतातच त्यांना सांगायची काय गरज, अशी मानसिकता असणारे अनेक पदाधिकारी वसमतमध्ये आहेत. जे फक्त नेते व उमेदवारांच्या सोबत राहण्यात पटाईत असतात. उमेदवारांचा प्रचार मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आलेली शिदोरी घरीच ठेवणारेही अनेकजण आहेत.एकंदरीत आतापर्यंत तरी उमेदवारांचा कोणताही प्रभाव प्रचारात दिसलेला नाही.वसमत शहरात तर बोटावर मोजण्याएवढेच काम करताना दिसतात. त्यातीलही अनकजण ‘शक्कर’वर लक्ष ठेवूनच असावेत. दोन्ही प्रमुख पक्षांचे न झेंडे दिसतात न बॅनर. मतदार संपर्क अभियानही दिसत नाही. फक्त पक्षाच्या भरवशावरच ही निवडणूक सुरू असल्याचे विचित्र वातावरण वसमतमध्ये पहावयास मिळते. मतदारांशी संपर्क न साधताही मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडतातच, ज्याला मत द्यायचे त्याला मत देतातच ज्यांच्यावर बुथची जबाबदारी असते त्याने पडलेली मते माझ्यामुळेच पडली, असे सांगण्याचीही वसमतमध्ये जुनी पद्धत आहे. बुथ प्लस राहिले तर माझ्यामुळे राहिले अन् मायनस राहिले तर एखाद्यावर खापर फोडण्याचीही पद्धत आहे. असे बुथ मॅनेजमेंट यावेळीही होते की काही वेगळा अनुभव पहावयास मिळतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण