शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात; यंदाही लक्ष्मण नाईक तांडावासीयांच्या नशिबी भीषण पाणीटंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 18:58 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील अनेक गावांत एप्रिलच्या सुरुवातीपासूनच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, काही गावांत बोअर, विहीर अधिग्रहण करून, तर काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

- शेख हबीबऔंढा नागनाथ (जि. हिंगोली) : यंदाही तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडावासीयांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गत तीन वर्षांपासून येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी सातत्याने पाणीपुरवठा योजनेची मागणी केली जात आहे. परंतु, दरवर्षी तात्पुरत्या उपाययोजना करून शाश्वत पाणीपुरवठा योजनेला बगल देण्याचे काम सुरू आहे. परिणामी, हंडाभर पाण्यासाठी तांडावासीयांना जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील अनेक गावांत एप्रिलच्या सुरुवातीपासूनच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, काही गावांत बोअर, विहीर अधिग्रहण करून, तर काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथे मार्च महिन्याच्या मध्यापासून भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. परंतु, गत तीन वर्षांपासून सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करून देखील पाणीटंचाईवर दीर्घकालीन योजनेला मंजुरी मिळत नसल्यामुळे येथील ग्रामपंचायतीद्वारे तात्पुरत्या उपाययोजनेसाठी प्रस्ताव देण्यात आला नाही. परिणामी, तांडावासीयांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीमार्फत जलजीवन योजना मंजुरीसाठी तीन वर्षांपूर्वी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

आश्वासन हवेतच विरलेविधानपरिषदेचे आमदार श्रीकांत भारती यांनी पाणीटंचाईबाबत वर्तमानपत्रातील बातमीची दखल घेत २०२३ मध्ये लक्ष्मण तांडा येथे भेट देऊन सहा महिन्यांत योजना मंजूर करून पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु, दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही पाणीप्रश्न निकाली निघाला नाही.

पाण्याचे दुर्भिक्ष कायमहंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना जीव मुठीत घालून तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर पाणीटंचाईच्या झळा असह्य होऊन अनेकांनी स्थलांतर केले असल्याची माहिती येथील ग्रामस्थ रवींद्र पवार यांनी दिली. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष कायम असून, प्रशासनाने पाणीटंचाईवर शाश्वत उपाययोजना राबवून पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी टंचाईग्रस्त ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीwater shortageपाणीकपात