शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

चिमुकलीला आपटून मारणाऱ्या पित्यास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 3:21 PM

तीन वर्षांच्या मुलीस पायाला धरून जमिनीवर आपटले.

ठळक मुद्देपत्नीसोबत पैस्यावरून झाला वाद जखमी मुलगी आणि पत्नीला ठेवले कोंडून

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील म्हाळशी  येथे पत्नीला मारहाण करून तीनवर्षीय मुलीला जमिनीवर आपटून ठार मारणाऱ्या  विश्वनाथ कुंडलिक पांढरे या पित्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.बी. शिंदे यांनी २२ जानेवारी रोजी जन्मठेपेची शिक्षा  सुनावली.

१० फेब्रुवारी २०१७ रोजीच्या रात्री ११.३० वाजेच्या सुमारास म्हाळशी येथे  विश्वनाथ कुंडलिक पांढरे याने पत्नी रेणुकाबाईला ‘तु मला खर्चाला पैसे का देत नाहीस’ या कारणावरून वाद घालून मारहाण केली. तसेच त्यांची तीन वर्षांची मुलगी ईश्वरी हिच्या पायाला धरून जमिनीवर आपटले. यामुळे तिच्या डोक्याला जबर मार लागला. याबाबत कोणाला सांगितले तर तुला जिवे मारून टाकीन, अशी रेणुकाबाईस धमकी देत जखमी मुलीस घरात कोंडून ठेवले. यातून सुटका करून तिला वाशिम येथे रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान तिचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. रेणुकाबार्इंच्या तक्रारीवरून विश्वनाथ  पांढरेविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. फौजदार ए.एल. चिलांगे यांनी तपास करून हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून २२ जानेवारी रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.बी.शिंदे यांनी विश्वनाथ पांढरे यास  जन्मठेप व १० हजार रूपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षे सक्तमजुरी, तसेच कलम ३२४ नुसार एक वर्षे कारावास व २ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने सक्तमजुरी, कलम ३४१ नुसार एक महिनास कारावास व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ७ दिवस कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सहायक सरकारी वकील एन.एन. मुटकुळे, एस.डी. कुटे, एस.एस. देशमुख यांनी काम पाहिले. 

टॅग्स :Life Imprisonmentजन्मठेपHingoliहिंगोलीFamilyपरिवार