आज सरपंचपदाची आरक्षण सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST2021-02-05T07:53:42+5:302021-02-05T07:53:42+5:30

सेनगाव तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तालुक्यातील सरपंचपदासाठी गुरुवारी दुपारी १२ वाजता उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, ...

Leaving the reservation of Sarpanchpada today | आज सरपंचपदाची आरक्षण सोडत

आज सरपंचपदाची आरक्षण सोडत

सेनगाव तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तालुक्यातील सरपंचपदासाठी गुरुवारी दुपारी १२ वाजता उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार जीवककुमार कांबळे यांच्या उपस्थितीत शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरक्षण सोडत होणार आहे. या सोडतीला निर्वाचित सदस्य, नागरिकांनी उपस्थिती राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वसमत, कळमनुरीत आज उत्सुकता

वसमत व कळमनुरी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचपदासाठी २८ जानेवारी रोजी आरक्षण सोडत होणार आहे. वसमत येथे उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी तर कळमनुरीत प्रशांत खेडेकर व तहसीलदारांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत होणार आहे. या आरक्षण सोडतीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

उद्या औंढा, हिंगोलीत सरपंचपदाची आरक्षण सोडत

औंढा नागनाथ : तालुक्यातील १०१ ग्रामपंचायत सरपंचपदाचे सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठी आरक्षण सोडत २९ जानेवारी रोजी तहसील कार्यालयात होणार असल्याची माहिती तहसीलदार कृष्णा कानगुले यांनी दिली. उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांची सरपंच आरक्षण सोडतीकरिता समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी लोकप्रतिनिधी, नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांनी केले आहे. हिंगोली तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत होणार आहे. समन्वय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Leaving the reservation of Sarpanchpada today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.