शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

लर्निंग लायसन्स ऑफलाईनच बरे; आरटीओ कार्यालयात पुन्हा गर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:20 IST

हिंगोली: कोणाकडे अँड्राईड मोबाईल आहे तर कुणाला अँड्राईड मोबाईल असूनही तांत्रिक बाबी कळेना झाल्या आहेत. त्यामुळे घरबसल्या परीक्षा देऊन ...

हिंगोली: कोणाकडे अँड्राईड मोबाईल आहे तर कुणाला अँड्राईड मोबाईल असूनही तांत्रिक बाबी कळेना झाल्या आहेत. त्यामुळे घरबसल्या परीक्षा देऊन लर्निंग लायसन्स काढणे अवघड होऊन बसले असून ऑफलाईनच बरी, असे उमेदवारांचे म्हणणे आहे.

शिकावू परवाना पद्धतीमध्ये ऑनलाईन परीक्षा पद्धतीमध्ये परीक्षार्थीऐवजी तोतया उमेदवार अथवा इतरांमार्फत परीक्षा दिली जात आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया औपचारिकता उरेल, असे काहींचे म्हणणे आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेला किंवा मानसिकदृष्ट्या सक्षम नसलेला उमेदवार या प्रक्रियेतून विनासायास पुढे जाईल व अपघाताला बळी पडेल, असेही आरटीओ कार्यालयात आलेल्या काही उमेदवारांनी सांगितले. शहराच्या ठिकाणी अँड्राईड मोबाईल चालतो. परंतु, ग्रामीण भागात अँड्राईड मोबाईल काय साधाही मोबाईल चालत नाही. कधी रेंज असते तर कधी मोबाईल चार्जिंग झालेला नसतो. अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे लर्निंग लायसन्स अडकून बसून परीक्षा अर्धवटच राहते. नाइलाजाने आरटीओ कार्यालयात जाऊन रांगेत उभे राहावे लागत आहे. कोरोना महामारीमुळे शासनाने ऑनलाईन लर्निंग लायसन्स काढण्याची सुविधा दिली आहे. परंतु, तांत्रिक बाबीमुळे आरटीओ कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत.

ऑनलाईनसाठी अडचणी काय?

कोरोनामुळे शासनाने लर्निंग लायन्स काढण्यासाठी घरबसल्या सुविधा दिली आहे. परंतु, यात तांत्रिक बाबीचा अडथळा येत आहे. अँड्राईड काही ठिकाणी चालतो आहे तर काही ठिकाणी अँड्राईड मोबाईललाला रेंजही मिळत नाही. ग्रामीण भागात सर्वाकडे अँड्राईड मोबाईल असेलच असे नाही. पैसा नसल्यामुळे तो घेणेही शक्य नाही. कधी तर लर्निंग लायसन्ससाठी परीक्षा देतेवेळेसच मोबाईल हँग होऊन बसतो तर कधी अचानक चार्जिंग संपते. काहींना तर लर्निंगसाठीची ऑनलाईन पद्धत समजत पण नाही. त्यामुळे आरटीओ कार्यालयात येण्याची वेळ येत आहे.

उमेदवार वेगळा, ऑनलाईन परीक्षा देणारा दुसराच

ऑनलाईन प्रकारामुळे तोतयागिरी वाढली आहे. परीक्षा देणारा वेगळाच असतो आणि त्याला सांगणारा हा वेगळाच असतो. या अशा प्रकारामुळे पुढे चालून परीक्षार्थीला अपघाताला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. लर्निंगमध्ये पास झाल्याचा आनंद मिळत असला तरी परमनंट लायसन्स काढतेवेळेस प्रश्नांची उत्तरे देतेवेळेस जवळ कोणीही नसणार आहे.

प्रतिक्रिया...

शासनाने ऑनलाईन सुरू केलेली लर्निंग लायसन्सची प्रक्रिया चांगली आहे. परंतु, काही उमेदवारांना यात अडचणी येत आहेत. ऑनलाईनची माहिती नसेल तर आरटी कार्यालयाशी संपर्क साधून ती घ्यावी. लर्निंग असो वा इतर कोणतीही अडचण आल्यास आरटीओ कार्यालयाील कर्मचाऱ्यांकडून माहिती घ्यावी.

- अनंता जोशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

२५ टक्के ऑनलाईन

१९ जूनपासून ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाईन पद्धत समजत नाही म्हणून आतापर्यंत ४० जवळपास उमेदवार आरटीओ कार्यालयात आले होते. परीक्षा देतेवेळेस सर्व बाजू समजून घेऊन इतरांची मदत न घेता परीक्षा द्यावी. जेणेकरून भविष्यात वाहन चालविताना त्रास होणार नाही.

किती लायसन्स दिले?

२०१९- लर्निंग १५,०००

परमनंट- ८,४००

२०२०- लर्निंग १६,५००

परमनंट ९,०००

२०२१ लर्निंग ११,०००

परमनंट ७,५००

...म्हणून आरटीओ कार्यालय गाठले

लर्निंग लायसन्ससाठी शासनाने ऑनलाईन पद्धत सुरू केली आहे. ही पद्धत चांगली असली तरी तांत्रिक बाबी काही समजत नाहीत. परीक्षा देतेवेळेस मोबाईल हँग होत आहे. ऑनलाईन समजत नाही म्हणून तर आरटीओ कार्यालयात आलो, असे एका उमेदवाराने सांगितले.

शासनाने लर्निंगसाठी ऑनलाईन सुरू केली असली तरी ग्रामीण भागात अँड्राईड मोबाईल चालत नाही. मोबाईल अँड्रॉईड असूनही तांत्रिक बाबी काही समजायला मार्ग नाही. ऑनलाईन पद्धत काय असते, हे समजून घेण्यासाठी आलो होतो. परंतु, साहेब भेटले नाहीत, असेही एका उमेदवाराने सांगितले.

फोटो १५