वसमत तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रा.पं. कुरुंदाए तर जुनुना सर्वांत लहान ग्रामपंचायत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST2020-12-28T04:16:14+5:302020-12-28T04:16:14+5:30
वसमत तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आणि सर्वांत मोठी ग्रामपंचायत कुरुंदा आहे. या गावात एकूण सहा वॉर्डांत १७ सदस्य निवडून द्यायचे ...

वसमत तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रा.पं. कुरुंदाए तर जुनुना सर्वांत लहान ग्रामपंचायत
वसमत तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आणि सर्वांत मोठी ग्रामपंचायत कुरुंदा आहे. या गावात एकूण सहा वॉर्डांत १७ सदस्य निवडून द्यायचे आहेत. ग्रामपंचायतीसाठी ९ हजार ३४६ मतदार असून त्यातील ४८९७ पुरुष मतदार, तर ४४४९ महिला मतदार आहेत.
कुरुंदामध्ये सर्वच पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, काँग्रेस पक्षांचे कार्यकर्ते सक्रिय आहेत. विविध संघटना सक्रिय आहेत. वसमत कृउबासचे सभापती राजेश पाटील इंगोले हे कुरुंदा येथील आहेत. त्या पार्श्वभूमीवर कुरुंदा गावातील ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची हाेणार आहे. मात्र, अद्यापपर्यंत येथील पॅनलचे चित्र स्पष्ट झाले नाही.
वसमत तालुक्यातील सर्वांत लहान ग्रामपंचायत म्हणून जुनुना ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. येथे केवळ ३९४ मतदार आहेत. ७ सदस्य संख्या असलेली ही ग्रामपंचायत ५ सदस्य निवडल्या जाणार आहेत. तर दोन सदस्य सर्वसाधारण आहेत. येथे २०७ पुरुष तर १८९ महिला मतदार आहेत. गतवेळी याठिकाणी चुरशीची लढत झाली होती. यावेळी अद्याप पॅनल जाहीर झाले नसले तरी पॅनल बनविण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे. जुनुना ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक पातळीवरील मुद्दे आणि नेहमी कामाला येणारे कार्यकर्ते पाहूनच मतदार मतदान करणार असल्याचे दिसून येत आहे.