भाडेकरूंची नोंद करण्यास घरमालकांची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:23 IST2020-12-26T04:23:46+5:302020-12-26T04:23:46+5:30

हिंगोलीत मागच्या वर्षी शहर पोलिसांनीच विविध भागांमध्ये फिरून निदान परप्रांतीय लोकांच्या तरी भाडेकरू म्हणून राहणाऱ्या भागात जावून नोंदी केल्या ...

Landlords' reluctance to register tenants | भाडेकरूंची नोंद करण्यास घरमालकांची उदासीनता

भाडेकरूंची नोंद करण्यास घरमालकांची उदासीनता

हिंगोलीत मागच्या वर्षी शहर पोलिसांनीच विविध भागांमध्ये फिरून निदान परप्रांतीय लोकांच्या तरी भाडेकरू म्हणून राहणाऱ्या भागात जावून नोंदी केल्या होत्या. जवळपास १७० जणांची नोंद झाली होती. यंदा कोरोनामुळे पोलीस यात लक्ष घालू शकले नाहीत. मात्र, शहरात परप्रांतीय अथवा अनोळखी लोकांना खोली भाड्याने देणाऱ्यांनी तरी अशी नोंद करणे गरजेचे असताना ती केली नसल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी परप्रांतीय वास्तव्यास आहेत. प्रत्येकच जण वाइईट असतो, असे नाही. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या नोंदी असल्यास पोलीस प्रशासनालाही पुढील काळात काही अनुचित प्रकार घडला तर या माहितीचा वापर करून तपास कामात मोठी मदत होते. मात्र त्यासाठी नोंद आवश्यक आहे.

अद्याप घरमालकांवर कारवाई नाही

घरमालकांनी भाडेकरूंची नोंद करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. जर पोलीस ठाण्यात जाणे शक्य नसेल तर ऑनलाईन नोंद करण्याची सुविधाही जिल्ह्याच्या वेबसाईटवर आहे. मात्र तरीही नोंद न केल्यास क. १८८ नुसाार कारवाईही करण्याची सोय आहे. मात्र तशी सक्ती कधी केली जात नसल्याने नोंदणीसाठी उदासीनता आहे.

राजस्थान, उत्तर प्रदेशचे अनेक भाडेकरू

हिंगोलीत खाद्यपदार्थ विक्री, सुतारकाम, बांधकाम गवंडी, पीओपीचे काम आदी करण्यासाठी राजस्थान, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, उत्तराखंड आदी भागांतून येणारे कामगार व व्यावसायिक येथे भाडेकरू म्हणून राहतात. यापूर्वी तशी नोंद झाली होती.

घरमालकांनी आपल्याकडील भाडेकरूचे आधारकार्ड व फोटो घेवून त्याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करणे गरजेचे आहे. शासनाचेही तसे निर्देश असून स्थानिक प्रशासनानेही तसे आदेश दिले आहेत. घरमालकांनी तशी नोंद न केल्यास कारवाईही करता येवू शकते.

- पंडित कच्छवे,

पोलीस निरीक्षक, हिंगोली

Web Title: Landlords' reluctance to register tenants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.