जागेत हिस्सा का देत नाही, म्हणत नातवाने केली आजोबाची हत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 11:54 IST2018-04-13T11:54:56+5:302018-04-13T11:54:56+5:30

माझ्या वडिलांना वाटणीचा हिस्सा का देत नाही ? म्हणत एका २१ वर्षीय नातवाने आजोबाच्या डोक्यात विटेन वार करत गुरुवारी रात्री हत्या केली.

In land dispute, grandson killed the grandfather | जागेत हिस्सा का देत नाही, म्हणत नातवाने केली आजोबाची हत्या 

जागेत हिस्सा का देत नाही, म्हणत नातवाने केली आजोबाची हत्या 

आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : माझ्या वडिलांना वाटणीचा हिस्सा का देत नाही ? म्हणत एका २१ वर्षीय नातवाने आजोबाच्या डोक्यात विटेन वार करत गुरुवारी रात्री हत्या केली. विठ्ठल धनवे (७०) असे मृताचे नाव आहे या प्रकरणी गुरुवारी मध्यरात्री आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी नातवाला अटक केली करण्यात आली आहे. 

शहरातील देवीगल्ली येथे विठ्ठल सखाराम धनवे हे आपल्या पत्नीसमवेत स्वतः च्या घरात राहतात. तर त्यांचा मुलगा रामचंद्र हा त्याच्या कुटुंबासह हनुमान नगर येथे किरायाच्या घरात राहतो. त्याला तीन मुले आहेत. रामचंद्र याचा त्याच्या वडिलांशी ते राहत असेलेल्या जागेवरून वाद आहेत. रामचंद्र हा त्यांना जागेत वाटणी मागत असे. यातच काल रात्री रामचंद्रचा मुलगा दत्ता हा त्याच्या आजोबाच्या घरी गेला. तेथे त्याने आजोबांना आम्हाला जागा का वाटून देत नाही असे विचारले. यावरून त्यांच्यात जोराचे भांडण झाले व बाचाबाची झाली. यातच संतापलेल्या दत्ताने तिथे पडलेल्या विटेने आजोबाच्या डोक्यात तोंडावर वार केले. यामुळे गंभीर जखमी झालेल्या धनवे यांचा मृत्यू झाला. यानंतर कौशल्याबाई धनवे यांच्या फिर्यादीवरून दत्ता याच्याविरूध्द भा.दं.वि.च्या कलम ३०२,३२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दत्ताला अटक केली असून पुढील तपास पो.नि. व्यंकट केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सदानंद मेंडके करत आहेत.

Web Title: In land dispute, grandson killed the grandfather