कपाटातील १५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:24 IST2020-12-25T04:24:31+5:302020-12-25T04:24:31+5:30
वसमत : येथील काळीपेठ भागातील घराच्या कपाटातून १५ तोळे पाच ग्राम सोन्याचे दागिने किंमत ४ लाख ३३ हजार ५०० ...

कपाटातील १५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास
वसमत : येथील काळीपेठ भागातील घराच्या कपाटातून १५ तोळे पाच ग्राम सोन्याचे दागिने किंमत ४ लाख ३३ हजार ५०० रुपये चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी घरकाम करणाऱ्या महिलेविरोधात चोरीची तक्रार देण्यात आल्याने या महिले विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. १६ डिसेंबर रोजी चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
वसमत येथील वनिता अशोक दंडे, रा. काळीपेठ यांनी वसमत शहर पोलिसांत गुरुवारी तक्रार दिली. घरातील कपाटात कापडाच्या पिशवीत ठेवलेला सोन्याचा हार, पाच तोळ्याचा सोन्याचा हार, पाच तोळे सहा ग्रामची सोन्याची मोहनमाळ, एक तोळ्याची अंगठी असा एकूण ४ लाख ३३ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार दिली. महिला रिजवानाबी शेख अफसरवर संशय व्यक्त करून सदर महिलेविरोधात तक्रार देण्यात आली. या तक्रारीवरून वसमत शहर पोलिसांनी घरकाम करणाऱ्या महिलेविरोधात चाेरीचा गुन्हा नोंदविला आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, पोउपनि. प्रकाश आवडे, जमादार शेख हकीम आदींनी भेट देऊन पाहणी केली.