जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छतेचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:52 IST2021-02-05T07:52:47+5:302021-02-05T07:52:47+5:30
डांबरीकरण करण्याची मागणी हिंगोली : येथील जिल्हा परिषद ते नांदेड रोडकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याचे रुंदीकरण करण्यात ...

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छतेचा अभाव
डांबरीकरण करण्याची मागणी
हिंगोली : येथील जिल्हा परिषद ते नांदेड रोडकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत असले तरी अद्याप काम पूर्ण झाले नाही. हा मार्गही ये-जा करण्यासाठी महत्त्वाचा असताना या रस्त्याचे डांबरीकरण करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. याकडे लक्ष देऊन या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
पोलीस कर्मचाऱ्यामुळे वाहतूक झाली सुरळीत
हिंगोली : येथील नांदेड मार्गावरील रेल्वेगेटवर रेल्वे आली असता दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागतात. रेल्वे गेल्यानंतर पुढे जाण्याच्या नादात वाहतूक विस्कळीत होते. मात्र, सोमवारी वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याने दोन्ही बाजूच्या वाहनांना शिस्त लावत वाहतूक सुरळीत केली. त्यामुळे वाहनचालकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
कार्यालयासमोर वाहने
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या इमारतीसमोरच दुचाकी वाहने लावली जात आहेत. या ठिकाणी वाहनतळ उभारण्यात आले आहे. मात्र, इमारतीसमोरच वाहने उभी केली जात असल्याने कार्यालयात जाण्यासाठी अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजचा अर्थसंकल्प सादर केला; परंतु तो श्रीमंतांची घरे भरणारा आहे. या अर्थसंकल्पातून गरिबांना काहीही मिळणार नाही. गरीब ते गरीबच राहणार आहेत. केंद्राने अर्थसंकल्पावर विचार करावा.
- असेफ बागवान, हिंगोली
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करताना सर्व घटकांचा विचार करण्यात आला आहे. यातून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
- बिरजू यादव