जिल्ह्यात कोविड-१९ लसीकरण जनजागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:55 IST2021-02-18T04:55:16+5:302021-02-18T04:55:16+5:30

या बहुमाध्यम रथाचे अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो नांदेडचे ...

Kovid-19 vaccination awareness campaign in the district | जिल्ह्यात कोविड-१९ लसीकरण जनजागृती अभियान

जिल्ह्यात कोविड-१९ लसीकरण जनजागृती अभियान

या बहुमाध्यम रथाचे अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो नांदेडचे प्रचार अधिकारी माधव जायभाये, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी यांसह जिल्हा निबंधक संजय पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून स्वागत केले.

या बहुमाध्यम चित्ररथामध्ये शाहीर विठ्ठल काटे आणि संच बीड यांच्याद्वारे गीत व नाटक सादरीकरणाच्या माध्यमातून कोरोना लसीकरण, आत्मनिर्भर भारत, शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची जनजागृती करण्यात येणार आहे. या प्रचार मोहिमेचा मूळ उद्देश हा लोकांपर्यंत लसीकरण मोहिमेची खरी माहिती देऊन त्यांचा संभ्रम दूर करणे हा आहे. आत्मनिर्भर भारत अभियान या योजनेची माहिती ग्रामीण भागातील लोकांना देण्याचे अमूल्य कार्य या जनजागृती अभियानातून केले जाणार आहे.

पुढील दहा दिवस जिल्ह्यातील हिंगोली, सेनगाव, कळमनुरी, वसमत व औंढा नाथनाथ या तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच शहरी भागातून या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. फाेटाे न. ०१

Web Title: Kovid-19 vaccination awareness campaign in the district