चाकूने भोसकून पत्नीचा खून
By Admin | Updated: May 27, 2017 16:33 IST2017-05-27T16:33:16+5:302017-05-27T16:33:16+5:30
शहरातील नगर परिषद कॉलनी येथे घरगुती वादातून पतीनेच पत्नीला चाकूने भोसकल्याची घटना २७ मे रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली.

चाकूने भोसकून पत्नीचा खून
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 27 - शहरातील नगर परिषद कॉलनी येथे घरगुती वादातून पतीनेच पत्नीला चाकूने भोसकल्याची घटना २७ मे रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली. उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलविले असता सदर महिलेस डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मयत महिलेचे नाव परवीन बेगम शेख सलीम वय (४७) असल्याची माहिती जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी दिली. उपचारासाठी रूग्णालयात शनिवारी दुपारी २.३५ च्या सुमारास आणले.
मयत महिलेच्या पतीनेच पोटात चाकू भोसकल्याचे नागरिकांतून सांगितले जात असून याबाबत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे पोनि उदयसिंग चंदेल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. घटनेमागचे कारण समजू शकले नाही. मात्र आरोपी असलेला पती पोलिस ठाण्यात हजर झाल्याचेही सांगितले जाते.