ट्रॅक्टरच्या धडकेत एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:33 IST2018-04-02T00:33:15+5:302018-04-02T00:33:15+5:30
परभणी- हिंगोली मार्गावरील जवळा बाजार परिसरात सतरा मैल येथे ट्रक्टर व दुचाकीची समोरा- समोर धडक होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ३१ मार्च रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

ट्रॅक्टरच्या धडकेत एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा बाजार : परभणी- हिंगोली मार्गावरील जवळा बाजार परिसरात सतरा मैल येथे ट्रक्टर व दुचाकीची समोरा- समोर धडक होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ३१ मार्च रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
गजानन किसनराव तराळे (५०, रा. शेगाव जि. बुलढाना) ह.मु. खंडाळा ता. पुर्णा जि. परभणी असे मयताचे नाव आहे. ते जवळाबाजारकडून झिरोफाट्याकडे क्र. एमएच १९ ए ६६३० वरून हा जात असताना जवळाबाजारकडे येणाऱ्या एमएच २२ एक्स ५७५ ट्रक्टरची समोरासमोर धडक झाली. यात ते जागीच ठार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच जमादार शे. खुद्दूस शे. लाल, अरविंद गजमार यांनी भेट दिली. या प्रकरणी समाधान किसनराव तराळे रा. शेंगाव जि. बुलढाणा यांच्या फिर्यादीवरुन हट्टा पोलीस स्टेशनमध्ये दिली असून ट्रॅक्टर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.