शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

खून करून शेतकऱ्याचा मृतदेह शिवारात फेकला; पत्नी अन् तिच्या दोन प्रियकरांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 19:16 IST

तपासानंतर पोलिसांनी शेतकऱ्याची पत्नी आणि तिच्या दोन प्रियकरांना ताब्यात घेतले आहे.

कळमनुरी (जि. हिंगोली) : तालुक्यातील मसोडफाटा येथील शेत शिवारात आज सकाळी ७ वाजता एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. दरम्यान,  अनैतिक संबंधाच्या कारणावरुन हा खून करण्यात आल्याची माहिती तपासाअंती पोलिसांनी दिली. तसेच पोलिसांनी संशयित म्हणून मयताची पत्नी व तिच्या दोन प्रियकरांना ताब्यात घेतले आहे.

कळमनुरी तालुक्यातील शिवणी (खुर्द) येथील शेतकरी नामदेव तुकाराम मिरासे (वय ४५) यांचे गावापासून काही अंतरावर असलेल्या मसोडफाटा शिवारात शेत आहे. रविवारी रात्रीच्या वेळी नामदेव मिरासे हे त्यांच्या शेतात गेले होते. ३ जून रोजी सकाळी सात वाजता काही तरुणांनी नामदेव मिरासे यांचा मृतदेह रस्त्यालगत शेतात पाहिला. त्यांनी लगेच पोलिसांना ही माहिती दिली. 

यानंतर पोलिस निरीक्षक मोहन भोसले, उपनिरीक्षक गजानन कांगणे, जमादार माधव भडके, देवीदास सूर्यवंशी, माधव डोखळे, शकुराव बेले, रामा शेळके, शिवाजी देमगुंडे, प्रशांत शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली. त्यानंतर सदर मृतदेह तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. यानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचे उघडकीस आले. 

तीन आरोपींना केली अटक...स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष भूमिका बजावून चार तासाच्या आत खुनाचा उलगडा करून ३ आरोपींना अटक केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार नितीन गोरे, नरेंद्र साळवे, आजम प्यारेवाले, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, पोलिस उपनिरीक्षक गजानन कागणे विमल होगे, पोले आदींच्या पथकाने तपासाकामी सहकार्य केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली