अल्पवयीन मुलीस पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:04 IST2021-09-02T05:04:11+5:302021-09-02T05:04:11+5:30

जवळा बाजार येथील हनुमाननगर येथे वास्तव्यास असलेल्या या मुलीस कुणीतरी अज्ञाताने कोणत्यातरी कारणाने पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुलीचा ...

Kidnapped a minor girl | अल्पवयीन मुलीस पळविले

अल्पवयीन मुलीस पळविले

जवळा बाजार येथील हनुमाननगर येथे वास्तव्यास असलेल्या या मुलीस कुणीतरी अज्ञाताने कोणत्यातरी कारणाने पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुलीचा वर्ण गोरा, सडपातळ बांधा, ५.२ इंच उंची असून अंगावर काळ्या रंगाचा टॉप व पांढऱ्या रंगाची लेगीज आहे. अशा वर्णनाची मुलगी आढळल्यास हट्टा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

शेतीच्या वादातून महिलेस मारहाण

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील माथा येथे शेतीच्या वादातून एका महिलेस मारहाण केल्याची घटना १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.

ललिता गंगाधर शिंदे यांनी आमच्या धुऱ्यावर एरंडाचे झाड का लावले. ते तोडून घ्या, असे म्हणताच बबन वामनराव शिंदे व माऊली गरड याने शिवीगाळ केली, तर काशीनाथ वामन शिंदे याने काठीने मारहाण केली. तसेच या सर्वांनी जीवे मारण्याची धमकीही दिली. यावरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Kidnapped a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.