अल्पवयीन प्रेमी युगुल पोलिसांच्या जाळय़ात

By Admin | Updated: July 18, 2016 02:14 IST2016-07-18T02:14:39+5:302016-07-18T02:14:39+5:30

हिंगोली येथील प्रेमी युगुलास खदान पोलिसांनी ताब्यात घेतले.

Juvenile police girl | अल्पवयीन प्रेमी युगुल पोलिसांच्या जाळय़ात

अल्पवयीन प्रेमी युगुल पोलिसांच्या जाळय़ात

अकोला: हिंगोली येथून पळवून आणलेल्या एका अल्पवयीन मुलीसह युवकास खदान पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर दोघांनाही हिंगोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
शिवणी परिसरातील रेल्वेस्थानक परिसरात एका संशयित इसमाचा शोध घेण्यासाठी गेलेल्या खदान पोलिसांना हे दोघेही मिळून आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर युवकाने त्याचे नाव दिनेश राजू जाधव असून वाशिम जिल्हय़ातील उकर्डा येथील रहिवासी असल्याचे सांगितले. तसेच सोबतच्या मुलीला हिंगोली येथून पळवून आणल्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली.
प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी खदान पोलिसांनी युवकाचे नातेवाईक आणि हिंगोली पोलीस स्टेशनशी संपर्क साधून अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता हिंगोली येथील ग्रामीण पोलीस स्टेशनला मुलगी पळविल्याची तक्रार दाखल असल्याचे समोर आले. यावरून हिंगोली ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक मुंडे शनिवारी खदान पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. या प्रकरणी हिंगोली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असल्याने प्रेमी युगुलास हिंगोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई खदानचे ठाणेदार छगन इंगळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

Web Title: Juvenile police girl