करपेवाडी घटनेच्या निषेधार्थ जवळा बाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:53 IST2019-01-30T00:52:51+5:302019-01-30T00:53:28+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे करपेवाडी येथील नाभिक समाजाच्या मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला. मंगळवारी बंद पाळून प्रशासनाला निषेधाचे निवेदन देण्यात आले.

करपेवाडी घटनेच्या निषेधार्थ जवळा बाजार बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे करपेवाडी येथील नाभिक समाजाच्या मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला. मंगळवारी बंद पाळून प्रशासनाला निषेधाचे निवेदन देण्यात आले.
नाभिक समाजाच्या मुलीच्या हत्या झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळपासून जवळा बाजार पेठ बंद ठेवण्यात आली. सकाळी १० वाजता नाभिक समाजाच्या वतीने मूक मोर्चा पोलीस चौकीपर्यंत काढण्यात आला. त्यानंतर सपोनि गुलाब बाचेवाड यांना घटनेच्या निषेधार्थ निवेदन दिले. यावेळी जवळा बाजारसह परिसरातील नाभिक समाज बांधव उपस्थित होते.