जगत्‌गुरू संत तुकाराम महाराज जन्मोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:55 IST2021-02-05T07:55:17+5:302021-02-05T07:55:17+5:30

हिंगोली : मराठा सेवा संघप्रणीत जगत्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने २ फेब्रुवारी रोजी येथील शासकीय विश्रामगृहात संत तुकाराम महाराज ...

Jagat Guru Sant Tukaram Maharaj Janmotsav | जगत्‌गुरू संत तुकाराम महाराज जन्मोत्सव

जगत्‌गुरू संत तुकाराम महाराज जन्मोत्सव

हिंगोली : मराठा सेवा संघप्रणीत जगत्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने २ फेब्रुवारी रोजी येथील शासकीय विश्रामगृहात संत तुकाराम महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १५ सत्कारमूर्तींचा गौरव करण्यात आला.

जगत्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने मंगळवारी जगत्‌गुरू तुकोबाराय जन्मोत्सव कार्यक्रमाला खंडेराव सरनाईक, प्रा. केळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी ढोकर, प्रा. सुधाकर इंगोले, दिलीप घ्यार यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल डॉ. गोपाल कदम, डॉ. बालाजी भाकरे, महिला पोलीस कर्मचारी शेख सलमा यांच्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुधाकर इंगोले म्हणाले की, तुकोबारायांनी १६ व्या शतकात या मातीत क्रांतीची बिजे रोवली आहेत. अभंगवाणीतून समाजपरिवर्तनाचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या विचाराने प्रेरणा घेऊन समाजाची नैतिक उन्नती व्हावी, संत तुकोबारायांचे विचार नव्या पिढीपर्यंत जावेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष प्रा. सुधाकर इंगोले, संगीता मगर, डॉ. नामदेव सकरटे, प्रा. मुरलीधर शिंदे, माधव जाधव, डॉ. रामदास शिंदे, बालासाहेब पतंगे, किशन गुंडेकर, महेश राखोंडे, कृष्णा वानखेडे, सुशील अंभोरे, प्रा. डॉ. आशिष कदम आदींनी परिश्रम घेतले.

फाेटाे नं. २०

Web Title: Jagat Guru Sant Tukaram Maharaj Janmotsav