मासिक पाळीत लस घेता येते का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:48 IST2021-05-05T04:48:50+5:302021-05-05T04:48:50+5:30

जिल्ह्यात कोरोना महामारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. त्यामुळे लस घेण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. १६ जानेवारी २०२१ ...

Is it possible to get vaccinated during menstruation? | मासिक पाळीत लस घेता येते का ?

मासिक पाळीत लस घेता येते का ?

जिल्ह्यात कोरोना महामारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. त्यामुळे लस घेण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. १६ जानेवारी २०२१ ला लसीकरणास प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत ३४ हजार ७८६ पुरुषांनी, तर २६ हजार ४४६ महिलांनी कोरोना लस घेतली आहे. आरोग्याच्या दृष्टीने लसीकरण करणे हे लाभदायक असल्याचेही तज्ज्ञ डाॅक्टरांनी सांगितले. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असल्यामुळे गर्भवती मातांनी अंगणातच मास्क घालून फिरावे. अंगणाच्या बाहेर पडू नये, असेही जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.

स्त्रीरोगतज्ज्ञ काय म्हणतात ?

कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. तेव्हा महिलांनी मासिक पाळीत लस घेतली तरी चालेल; परंतु गर्भवती महिलांनी कोरोना लस घेऊ नये. कारण लसीचा बाळावर साईड इफेक्ट होऊ शकतो.

-डाॅ. उमा सोनी, हिंगोली.

कोरोना लस ही चांगली आहे. मासिक पाळीतही महिलांना लस घेता येते. गर्भवती महिलांनी लस घेण्याबाबत आरोग्य विभागाने अजूनही काही सूचना दिलेल्या नाहीत. तेव्हा या बाबीकडे लक्ष द्यावे.

-डाॅ. लीला करपे, हिंगोली.

गत दोन महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गभर्भवती महिलांनी लस घ्यावी की नाही, याबाबत आरोग्य विभागाने कळविले नाही. मासिक पाळीत कोरोना लस घेता येते. तेव्हा महिलांनी काळजी घ्यावी.

-डाॅ. माधुरी देशमुख, हिंगोली.

Web Title: Is it possible to get vaccinated during menstruation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.