उपवासाला साबुदाणा न खाल्लेलाच बरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:33 IST2021-08-12T04:33:41+5:302021-08-12T04:33:41+5:30
हिंगोली: श्रावण महिन्यात उपवास करणाऱ्यांची संख्य ही लक्षणीय अशीच असते. श्रावणात कोणी महिनाभर तर कोणी श्रावणी सोमवार उपवास म्हणून ...

उपवासाला साबुदाणा न खाल्लेलाच बरा !
हिंगोली: श्रावण महिन्यात उपवास करणाऱ्यांची संख्य ही लक्षणीय अशीच असते. श्रावणात कोणी महिनाभर तर कोणी श्रावणी सोमवार उपवास म्हणून धरतो. अनेक जण उपवासाचे काही न खाता उपवास करत रात्रीला उपवास सोडतात. रात्रीला जेव्हा उपवास सोडतात त्यावेळी त्यांच्या जेवणात जड पदार्थ असतात. हे जड पदार्थ पचण्यास कठीण जाते. साबुदाणा पचण्यास कठीण असल्यामुळे तो न खाल्लेला बरा, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.
दर का वाढले?
जुलै महिन्यापासून साबुदाणा व शेंगदाण्याचे भाव थोडेबहुत कमी-जास्त होत आहेत. भगर जुलै महिन्यात ११० तर ऑगस्टमध्ये १२० रुपये किलोने विक्री होत आहे. भगरीचे उत्पादन आपल्याकडे नसल्यामुळे बाहेरुन भगर आणावी लागते. अनेक जण उपवासाला भगर खातात. परिणामी भाव वाढल्याचे दुकानदार सुरेंद्र महाजन यांनी सांगितले.
उपवासाच्या पदार्थाचे दर (प्रति किलो)
भगर
१० जुलै मध्ये ११०
१० ऑगस्टमध्ये १२०
साबुदाणा
१० जुलै ६०
१० आॅस्ट ६०
नायलॉन साबुदाणा
१० जुलैमध्ये ११०
१० ऑगस्टमध्ये ११०
साबुदाणा आरोग्याला हानिकारक...
उपवासाच्या दिवशी साबुदाणा खाण्यास काही हरकत नाही. परंतु, तो पचण्यास कठीण जातो. मनुष्याने आठवड्यातून एक दिवस उपवास करायला पाहिजे. परंतु, जड पदार्थ खाण्यास टाळावे. साबुदाणा, शेंगदाणे हे उपवासाच्या दिवशी पचत नाहीत. शरीराची क्रिया सुरळीत राहण्यासाठी हलके पदार्थ खाऊन उपवास धरल्यास मनुष्य आजारी पडत नाही. उपवासाच्या दिवशी फळांना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे.
उपवास आहे, मग हे पदार्थ खा !
आठवड्यातून एक दिवस उपवास धरुन शरीराला आराम दिलाच पाहिजे. पण उपवासाच्या दिवशी न पचणाऱ्या पदार्थापासून सावध राहिले पाहिजे. डाळींब, सफरचंद, नारळाचे पाणी अशा फळांना प्राधान्य दिल्यास शरीर साथ देते. विशेष करुन उपवासाच्या दिवशी पाणी जास्त पिणे गरजेचे आहे. पाणी जास्त पिल्यास कोणतेही पदार्थ पचण्यास सोपे जातात.
- डॉ. दीपक मोरे, आहारतज्ज्ञ