अंशकालीन निदेशकांची मागवली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:29 IST2021-03-26T04:29:13+5:302021-03-26T04:29:13+5:30

हिंगोली : जिल्ह्यातील सहावी ते आठवीपर्यंतची विद्यार्थी संख्या १०० किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या शाळांवर काम केलेल्या अंशकालीन निदेशकांची माहिती ...

Invited information from part-time directors | अंशकालीन निदेशकांची मागवली माहिती

अंशकालीन निदेशकांची मागवली माहिती

हिंगोली : जिल्ह्यातील सहावी ते आठवीपर्यंतची विद्यार्थी संख्या १०० किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या शाळांवर काम केलेल्या अंशकालीन निदेशकांची माहिती शिक्षण विभागाने मागवली आहे. यापूर्वीही ही माहिती मागवली होती. जिल्हा परिषदेच्या सहावी ते आठवीपर्यंतच्या शाळांतील १०० किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांवर क्रीडा, कार्यानुभव व चित्रकला विषयांसाठी अंशकालीन निदेशक म्हणून पात्रताधारकांची २०११पासून नियुक्ती करण्यात आली आहे. या निदेशकांना शाळेवर नियुक्त्या देण्यात याव्यात, यासाठी गेल्या काही वर्षांपासून अंशकालीन निदेशकांचा पाठपुरावा सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी शिक्षण विभागाने अंशकालीन निदेशकांची शाळानिहाय माहिती मागवली होती. सर्व अंशकालीन निदेशकांनी ही माहिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत सादर केली होती. आता पुन्हा २०११ ते २०१९पर्यंत काम केलेल्या अंशकालीन निदेशकांची माहिती मागवली आहे. याबाबतचे पत्र २२ मार्च रोजी शिक्षणाधिकारी कार्यालयाने गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठवले आहे.

Web Title: Invited information from part-time directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.