इंटरसिटीला थांबा न दिल्यास तीव्र आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:34 IST2021-01-16T04:34:55+5:302021-01-16T04:34:55+5:30
वसमत येथे रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने १५ जानेवारी रोजी दक्षिण-मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकास निवेदन देण्यात आले. यात इंटरसिटी ...

इंटरसिटीला थांबा न दिल्यास तीव्र आंदोलन
वसमत येथे रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने १५ जानेवारी रोजी दक्षिण-मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकास निवेदन देण्यात आले. यात इंटरसिटी एक्सप्रेसला थांबा न दिल्याबद्दल तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. सर्वाधिक प्रवासी असतानाही वसमतसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी थांबा रद्द करण्यात आला. हा निर्णय प्रवाशांची प्रचंड गैरसोय करणारा असून, त्वरित हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. नांदेडसारख्या उमरी, धर्माबादसारख्या लहान रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे वसमत येथेही इंटरसिटीला थांबा देण्यात यावा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर नगरसेवक नवीनकुमार चौकडा, एस. के. पाशा, जगदीश मोरे, दीपक कुलथे, नगरसेवक आशिष पवार, सागर दलाल, सचिन बोबडे, पवन दरक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.