शिवाजीनगरात गतिरोधक बसवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:13 IST2021-01-24T04:13:53+5:302021-01-24T04:13:53+5:30

आखाडा बाळापूर येथे स्वच्छता मोहीम राबवावी आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील मुख्य रस्ता ते बसस्थानकापर्यंत रस्त्यावर दोन्ही बाजूंना कचऱ्याची ढिगारे ...

Install speed bumps in Shivajinagar | शिवाजीनगरात गतिरोधक बसवावे

शिवाजीनगरात गतिरोधक बसवावे

आखाडा बाळापूर येथे स्वच्छता मोहीम राबवावी

आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील मुख्य रस्ता ते बसस्थानकापर्यंत रस्त्यावर दोन्ही बाजूंना कचऱ्याची ढिगारे साचलेली पहायला मिळत आहेत. यामुळे दुकानदार व पादचाऱ्यांना त्रास होत आहे. ग्रामपंचायतने याची दखल घेऊन या भागात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

आंबाचोंडी येथे साफसफाईची मागणी

आंबाचोंडी: वसमत तालुक्यातील आंबाचोंडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह परिसरात मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे सर्वत्र डासांचे प्रमाण वाढले आहे. याचबरोबर झाडेझुडपेही वाढली आहेत. संबंधित विभागाने याची दखल घेऊन प्रजासत्ताक दिनापूर्वी विश्रामगृह परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

घंटागाडी वेळेवर फिरकेना

हिंगोली: शहरातील शिवाजीनगर, तोफखाना, शास्त्रीनगर, कापड गल्ली आदी भागांमध्ये मागील काही दिवसांपासून घंटागाडी वेळेवर येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना घंटागाडीची वाट पहावी लागत आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने याची दखल घेऊन घंटागाडीच्या वेळा ठरवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Install speed bumps in Shivajinagar