कोरोनानंतरचे साइड इफेक्ट्स वाढले, औषधी काळजीपूर्वक घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:31 AM2021-05-11T04:31:33+5:302021-05-11T04:31:33+5:30

हिंगोली जिल्ह्यात ९ मेपर्यंत १४ हजार १८३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १३ हजार १९ रुग्ण बरे झाले ...

Increased side effects after corona, take the drug carefully | कोरोनानंतरचे साइड इफेक्ट्स वाढले, औषधी काळजीपूर्वक घ्या

कोरोनानंतरचे साइड इफेक्ट्स वाढले, औषधी काळजीपूर्वक घ्या

Next

हिंगोली जिल्ह्यात ९ मेपर्यंत १४ हजार १८३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १३ हजार १९ रुग्ण बरे झाले आहेत. असे असले, तरी ज्या रुग्णांना तीव्र लक्षणे होती, त्यांना अशक्तपणा, अंगदुखी, दम लागणे असे आजार उद्भवत आहेत. त्यामुळे त्रास जाणवणाऱ्या रुग्णांनी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत, असे मत डॉक्टरांकडून व्यक्त हाेत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनानंतर साइड इफेक्टचा रुग्ण आढळला नसला, तरी इतर जिल्ह्यात रुग्णांना साइड इफेक्टसला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पुढील काही महिने तरी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

काय होतात परिणाम

- मध्यम व तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांमध्ये अशक्तपणा, अंगदुखी, दम लागणे, अंधारी येणे आदी आजार आढळून येत आहेत.

- याशिवाय काही रुग्णांमध्ये गंभीर स्वरूपाचे आजार निर्माण होत आहेत. हृदय, किडनी, फुप्फुस आजार नव्याने जडत आहेत.

रेमडेसिविरचे साइड इफेक्ट्स ...

कोरोनाबाधितांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन रामबाण औषध असल्याप्रमाणे अतिरेकी वापर होत आहे. मात्र, आजारातून बरे झाल्यानंतर अतिरेकी वापराचे साइड इफेक्ट्स जाणवू लागले आहेत.

- हृदयाची गती खालावत असल्याचे आढळून येत आहे. अशा रुग्णांना हृदयविकाराचा धोका अधिक असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.

- रक्त तयार करणाऱ्या महत्त्वाच्या घटकाची कार्यक्षमता मंदावत असल्याने, इतर आजारांना सामोरे जावे लागत आहे. अतिरेकी वापरामुळे रक्तातील पेशी कमी होण्याचे प्रमाणही जास्त असल्याचे जाणकार सांगत आहेत.

स्टेरॉइडचे साइड इफेक्टस...

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना स्टेराॅइडचाही वापर होत आहे. स्टेरॉइडचा अतिवापरही धोकादायक ठरत आहे. मध्यम ते तीव्र लक्षणे असलेले कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांच्यातील हायपरटेन्शन वाढत आहे. त्यामुळे मधुमेहसारख्या आजाराला आमंत्रण मिळत आहे. फुप्फुसासंदर्भातील क्रयशक्तीही कमी होत असल्याचे सांगितले जात आहे.

प्रतिक्रिया...

रेमडेसिविर व स्टेरॉइडचा साइड इफेक्ट नाही. तरीही दोन्ही इंजेक्शनबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे.

- डॉ.गोपाल कदम, निवासी वैद्यकीय अधिकारी

कोरोनानंतर साइड इफेक्ट जाणवत असल्याच्या सध्या तरी तक्रारी नाहीत, तरीही कोरोना झाल्यानंतर काही दिवस स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

-डॉ.राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक

Web Title: Increased side effects after corona, take the drug carefully

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.