शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव कर्जमाफी अजूनही बासनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:30 IST

कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफीचा आदेश शासनाने काढल्यानंतरही त्याचा लाभ मात्र कुणाला मिळाला याचे काहीच गणित दिसत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफीचा आदेश शासनाने काढल्यानंतरही त्याचा लाभ मात्र कुणाला मिळाला याचे काहीच गणित दिसत नाही. कदाचित पूर्वीचीच रक्कम मिळाली नसल्याने अनेकांनी नव्या निर्णयाचा लाभच घेतला नसल्याचे चित्र आहे.१0 आॅगस्ट २0१८ रोजी सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या शासन निर्णयात कर्जमाफीच्या निर्णयात अंशत: बदल करून त्याची व्याप्ती वाढविली होती. यात सुरुवातीला दीड लाख मर्यादेपर्यंत ३0 जून २0१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्यांना प्रत्येक पात्र कुटुंबातील एका सदस्याला कर्जमाफी दिली होती. तर यापेक्षा जास्त कर्ज असल्यास त्यापुढील रक्कम भरूनही लाभ घेता येणार होता. मात्र नव्या निर्णयानंतर त्या कुटुंबातील दुसऱ्या सदस्यासही दीड लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ देता येणार आहे. त्यासाठी संबंधितांना कसा लाभ द्यावा हे उदाहरणासह परिशिष्ट अमध्ये नमूद केले आहे. जर थकबाकीच्या आधारे एकरकमी परतफेड योजनेच्या लाभासाठी दीड लाखांवरील रक्कम भरून लाभ घेतला तर ती शासनाकडून परत करण्यात येईल, असे म्हटले होते. तर थकबाकी दीड लाखांच्या आत असल्यास आणि लागू असेल तेथे अशा सदस्यांकडील पुनर्गठित कर्जाची उर्वरित हप्त्यांच्या देय असलेल्या रकमेसह दीड लाखाच्या मर्यादेत लाभ देता येईल, असेही स्पष्टपणे म्हटले होते. तर अशा खातेदारांची नावे ज्या अर्जात असतील त्यात लाभार्थी क्रमांक एक व दोनबाबत कर्जमाफीचा लाभ देताना कोणती व कशी काळजी घ्यायची याची गणितीय माहितीही उदाहरणादाखल दिली. तरीही हिंगोली जिल्ह्यात अद्याप नव्या निकषाप्रमाणे कोणाला लाभ मिळाल्याचे चित्र दिसत नाही. यामागे नेमके कारण काय? हे न उलगडणारे कोडे आहे.कर्जमाफीच्या योजनेत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१७५८ लाभार्थ्यांना २७.४१ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकेच्या ३७१७८ जणांना १९२.११ कोटी, तर ग्रामीण बँकेच्या ८९६१ जणांना ४९.८९ कोटी अशा २६९ कोटींच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार होता. यापैकी ६२ हजार ११६ शेतकºयांच्या खात्यावर २४८.३४ कोटी रुपयांची रक्कम जमा झाल्याचे बँकांकडून उपनिबंधक कार्यालयात सांगण्यात आले. यात जिमसचे २२.४६ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांचे १८९ कोटी तर ग्रामीण बँकांचे ३६.११ कोटी रुपये खात्यावर जमा झाले आहेत.अजूनही ५७८१ जणांचे २१.0८ कोटी रुपये त्यांच्या खात्यावर जमा करावयाचे बाकी आहेत. यात जिमसचे ३२४७, राष्ट्रीयीकृत बँकांचे २७८ तर ग्रामीण बँकेचे जवळपास २२५६ खातेदार आहेत. ग्रामीण बँकेच्या २५ टक्के लाभार्थ्यांचा प्रश्न अद्याप कायम आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी