औंढा नागनाथ येथे विविध विकासकामांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:56 IST2021-02-05T07:56:13+5:302021-02-05T07:56:13+5:30

औंढा शहरातील रमाबाई आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व बौद्धविहाराच्या सभामंडप व सभागृह सुशोभीकरण कामासाठी व काजीदरातांडा येथे रस्ते, ...

Inauguration of various development works at Aundha Nagnath | औंढा नागनाथ येथे विविध विकासकामांचे उद्घाटन

औंढा नागनाथ येथे विविध विकासकामांचे उद्घाटन

औंढा शहरातील रमाबाई आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व बौद्धविहाराच्या सभामंडप व सभागृह सुशोभीकरण कामासाठी व काजीदरातांडा येथे रस्ते, नाली बांधकाम करण्यासाठी तर प्रभाग ५ मध्ये नवीन वस्ती असलेल्या ठिकाणी रस्ते व नाली बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला. या कामाच्या फलकाचे उद्घाटन पालकमंत्री वर्षाताई गायकवाड व खा. राजीव सातव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी औंढा शहरातील प्रमुख मार्गाने पालकमंत्री वर्षाताई गायकवाड, खासदार राजीव सातव, माजी आ. संतोष टारफे यांनी पदयात्रा काढली. यावेळी पदयात्रेमध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. माजी आ. संतोष टारफे, सिद्धार्थ हत्तीअंभीरे, पक्षनिरीक्षक मुंडे, तालुका अध्यक्ष रमेश जाधव, माणिकराव पाटील, नगरसेवक सुमेध मुळे, उपनगराध्यक्षा वच्‍छलाबाई देशमुख, शेषराव देशमुख, बाळासाहेब देशमुख, सुरेश जावळे, पंकज जाधव, महेंद्र जोंधळे, संदीप गोबाडे, नंदू पाटील, विकी देशमुख, नगरसेवक देशमुख, अजू इनामदार, मोईन मोलाना, आकाश सुतारे, नदीम पिंजारी, राहुल नागरे, रमेश मुळे, राधिका चिंचोलीकर, सुजाता मुळे, मोतीराम जाधव, जावेद इनामदार, छोटूभाई, अक्रम खतीब, ताहेर पठाण, फारुख इनामदार, पंकज जाधव, किरण पाईकराव, कपिल मुळे, सुनील जोंधळे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते हजर होते.

Web Title: Inauguration of various development works at Aundha Nagnath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.