अखिल भारतीय झुंजवादी संमेलनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:53 IST2018-01-28T23:53:49+5:302018-01-28T23:53:52+5:30
नगरपररिषद हिंगोली, शब्दांगार साहित्य परिषद, कल्याण संशोधन केंद्र, कै. बाबूराव पाटील महाविद्यालय तसेच सद्भाव सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जानेवारी रोजी अखिल भारतीय झुंजवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

अखिल भारतीय झुंजवादी संमेलनाचे उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : नगरपररिषद हिंगोली, शब्दांगार साहित्य परिषद, कल्याण संशोधन केंद्र, कै. बाबूराव पाटील महाविद्यालय तसेच सद्भाव सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जानेवारी रोजी अखिल भारतीय झुंजवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
सकाळी ९ वाजता कै. बाबुराव पाटील महाविद्यालय येथून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, नारायण खेडेकर, डॉ. जब्बार पटेल, डॉ. कल्याणकर, प्राचार्य जयवंत भोयर, अभयकुमार भरतीया आदी उपस्थित होते. साहित्य संमेलानचे उदघाटन माजी केंद्रीयमंत्री सुर्यकांता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खा. शिवाजी माने, आ. रामराव वडकुते, आ. तान्हाजी मुटकुळे, माजी आ. गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी कुलगुरू जनार्धन सुर्यवंशी, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मनोज आखरे, हरिचंद्र शिंदे, रामरतन शिंदे, डॉ. जयदीप देशमुख, डॉ. माधुरी देशमुख, जातपडताळणी समिती सचिव छाया कुलाल, जनार्धन पाटील, डॉ. कल्याणकर, गणेश बांगर, डॉ. जब्बार पटेल, सुरेश धूत, विजय ठाकरे, अशोक अर्धापुरकर, खंडेराव सरनाईक आदी उपस्थित होते.