शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर ५१ गुन्हेगार हद्दपार, तर २ जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 14:56 IST

वसमत पोलीसांनी घेतली दक्षता; २० जणांवर एमपीडीए अंतर्गत केली कारवाई

- इस्माईल जाहगीरदारवसमत : गणेश विसर्जन दोन दिवसांवर आले असून त्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी दक्षता घेतली आहे. शहरातील ५१ गुन्हेगार प्रवृतीधारकांना तीन दिवसांसाठी शहरातून हद्दपार केले आहे. तर २ जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. सण उत्सव शांततेत साजरे व्हावेत, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात पोलिस बंदोबस्तात वाढ झाल्याने छावनीचे स्वरूप आले आहे.

वसमत शहरात सण, उत्सव शांततेत साजरे व्हावेत यासाठी पोलिसांनी दक्षता ठेवली आहे.  २८ सप्टेंबर रोजी विसर्जन असून सर्व मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी पोलिस प्रशासनाने दक्षता घेतली आहे. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीधारकांचे हद्दपार प्रस्ताव उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्याकडे सादर करत मंजुरी घेतली. २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान ५१ जण तडीपार करण्यात आले आहेत. त्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. 

तसेच शहरातील २० गुन्हेगार प्रवृतीधारकांवर ११० अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच दोंघावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करुन त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शहरात सण, उत्सव शांततेत साजरे व्हावे, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात मुख्य चौकासह १० ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांची १३ मानाचे गणपतीसह १०९ गणपती परीसरात पोलिसांची वाढती गस्त आहे. शहरात १५० पोलिस कर्मचारी व १० अधिकाऱ्यांच्या ताफ्याने छावनीचे स्वरूप आले आहे.

गणेशोत्सव शांततेत साजरे करा...शहरात शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी पोलिस प्रशासनाने घेत ५१ गुन्हेगार प्रवृतीधारकांना तीन दिवस शहरातून हद्दपार केले आहे. तर २० जणांवर कारवाई केली आहे. दोन जणावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. गुन्हेगार प्रवृतीवर पोलिसांची करडी नजर आहे. संशयास्पद प्रकार दिसून आल्यास नागरिकांनी पोलीस प्रशासनास माहिती द्यावी.- चंद्रशेखर कदम, पोलिस निरीक्षक, वसमत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली