शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हा दाखल न करण्यासाठी हवालदाराने पोलीस ठाण्यातच घेतली ५ हजारांची लाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 19:32 IST

वसमत ग्रामीण ठाण्याचा पोलिस हवालदार एसीबी पथकाच्या ताब्यात

- इस्माईल जहागीरदारवसमत : पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल न करता प्रकरण मिटवून घेण्यासाठी पाच हजार रूपयांची लाच स्विकारताना वसमत ग्रामीण ठाण्याच्या पोलिस हवालदारास  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ग्रामीण पोलीस ठाण्यात रंगेहात पकडले. ही कारवाई ५ डिसेंबर रोजी वसमत येथे करण्यात आली. संजय दत्तात्रय गोरे असे लाच स्विकारणाऱ्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. 

वसमत पोलिस ठाण्यात तक्रारदार यांच्या विरूद्ध अर्ज प्राप्त झाला होता. त्या अर्जाची चौकशी पोलिस हवालदार संजय दत्तराव गोरे याच्याकडे होती. पोलिस हवालदार गोरे याने गुन्हा दाखल न करता प्रकरण मिटवून घेण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदाराने २३ ऑक्टोबर २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ५ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वसमत ग्रामीण पोलीस ठाणे येथे सापळा रचला. त्यावेळी संजय दत्तात्रय गोरे याने पाच हजार रूपयांची लाच स्विकारताच पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले. याप्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. 

ही कारवाई  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक संदीप पालवे, अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ.संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, पोलिस निरीक्षक विनायक जाधव, महंमद युनूस, विजय शुक्ला, तानाजी मुंढे, रविंद्र वरणे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, राजाराम फुपाटे, भगवान मंडलिक, गोविंद शिंदे, गजानन पवार, शेख अकबर, योगिता अवचार, शिवाजी वाघ यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली