शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार; कयाधू नदीला पूर, घर पडले

By विजय पाटील | Updated: July 19, 2023 12:14 IST

सुदैवाने कोणतीही जीवितहानी यात झाली नाही.परंतु या घटनेत दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.

हिंगोली: पावसाळ्याच्या दीड महिन्यानंतर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले असून काही नागरिकांचे घरेही पडली आहेत. पहिल्यांदाच शहरातून वाहणाऱ्या कयाधू नदीला पूर आला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझड झाली असली तरी जोरदार पावसामुळे शेतकरी मात्र सुखावला आहे.

यावर्षी पाऊस जोरदार पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. परंतु जून महिना कोरडाच गेला. त्यामुळे शेतकरीवर्ग पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. त्यातच १८ जुलै रोजी दुपारी दोन वाजेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. नदी, ओढे, नाले या पावसामुळे भरुन वाहत आहेत. १८ जुलैच्या मध्यरात्रीही जिल्ह्यातील सर्वच भागात जोरदार पाऊस झाला. १९ जुलै रोजीही पावसाची संततधार सुरुच आहे. 

संतधार पावसामुळे हिंगोली शहरातील गवळीपुरा भागात असलेल्या सैलानीबाबा चौकातील सोनूताई सूर्यभान चव्हाण या महिलेचे घर मंगळवारी रात्री झालेल्या पावसात कोसळले. यावेळी सोनूताई चव्हाण या महिलेच्या भावाचा मुलगा किरण चव्हाण आणि त्यांचा नातेवाईक ओमकार भास्कर खंदारे हे दोघेजण खोलीमध्ये झोपले होते. दरम्यान, त्यांच्या अंगावर घरावरील पत्रे आणि विटा  पडल्या. भींत पडल्याचा आवाज कानी पडताच सर्वजण धावून आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी यात झाली नाही.परंतु या घटनेत दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेमुळे महिलेचा संसार उघड्यावर आला आहे. 

एकंदर हिंगोली शहरासह  जिल्ह्यातील गोरेगाव, सेनगाव, वसमत, नर्सी नामदेव, कळमनुरी, कुरुंदा, औंढा, डिग्रस कऱ्हाळे, कनेरगावनाका, जवळाबाजार आदी भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. सर्वच भागातील नदी, ओढे, नाले जोरदार पावसामुळे भरुन वाहत आहेत. तीन आठवड्यांपूर्वी ज्या शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली त्या पिकांना जीवदान मिळाले आहे. 

कयाधू नदीला पहिल्यांदाच पूर...यावर्षी जून महिना कोरडा गेल्यामुळे गावोगावी अन्नदान केले जात होते. मोठा पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरीवर्गही चिंताग्रस्त होता. आषाढी एकादशीनंतर पावसाचा जोर वाढेल, असा विश्वास शेतकऱ्यांना होता. त्याप्रमाणे जुलै महिन्याच्या चौ्थ्या आठवड्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली. यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच शहरातून वाहणाऱ्या कयाधू नदीला पूर आला आहे. जिल्ह्यातील ओढे, नालेही खळखळून वाहू लागले आहेत.

टॅग्स :Hingoliहिंगोलीriverनदी