शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी शेत कामात व्यस्त; इकडे भर दिवसा एकाच टोळीची ३ गावांत घरफोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 19:16 IST

अंदाजे १० लाख रुपयांचा ऐवज लंपास; सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांचा तपास सुरू

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : तालुक्यातील गोजेगाव, येळी व हिवरखेडा येथे एकाच दिवशी भर दुपारी घरफोडी करीत लाखोंचा ऐवज लुटून चोरटे विना क्रमांकाच्या दुचाकीवरून पसार झाले. सदर घटना बुधवारी दुपारी २ ते ३ : ३० वाजेदरम्यान घडली. विशेष म्हणजे, तिन्ही ठिकाणी घरफोडी करणारे चोरटे एकच असल्याची माहिती आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजवरून पोलिस अधिक तपास करत आहेत. 

पावसाने उघडीप दिल्यामुळे सध्या शेतीत निंदन, खुरपण व फवारणीचे काम जोमात सुरु आहेत. शेतीच्या कामांना मजूर मिळत नसल्यामुळे गावांतील आबालवृद्ध सध्या शेतात राबत असल्याने दिवसभर गावे निर्मनुष्य राहत आहेत. नेमका याचाच फायदा घेत औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव, येळी व हिवरखेडा येथे चोरट्यांनी भरदुपारी २ ते ४ वाजेदरम्यान घरफोडी करीत लाखो रुपयांचा ऐवज लुटला. 

घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांनी सहकारी पोलीस उप निरीक्षक किशोर पोटे, जमादार संदीप टाक, गाजनन गिरी यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील घटनास्थळी दाखल झाले होते. गोजेगाव येथून घरफोडी करून दुचाकीवरून पसार होताना एकाने व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्यामुळे चोरटे कॅमेरात कैद झाले असून औंढा पोलिस त्यांच्या मागावर आहेत.

अशा झाल्या घटनागोजेगाव येथे दुपारी दोन वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी गंगाधर गणपतराव सांगळे यांच्या घरात कुलूप तोडून प्रवेश केला. येथून तीन तोळ्यांची पोत व एकदानी असा सोन्याचा चार तोळ्यांचा ऐवज लंपास केला. त्यानंतर सचिन भानुदास सांगळे यांच्या घरातील महिलांचे दहा तोळे सोन्याचे दागिने लांबविले. दरम्यान, इतर दोन ते तीन घरांचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. गोजेगाव येथील घरफोडीनंतर चोरट्यांनी ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या येळी गावात दाखल होत राजू वैजनाथ सांगळे यांच्या घराचे कुलूप तोडून दोन तोळे सोन्याचे दागिने व नगदी रक्कम पळविली. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा हिवरखेडा येथे वळविला. तेथील बाळू अश्रोबा गीते यांच्या घरात घुसून सोन्याची पोत चोरी करून चोरटे  पसार झाले. भरदिवसा दोन तासांत तीन गावात झालेल्या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली