लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अवैध गौणखनिज विरोधी पथकाने कयाधु नदी पुलावर ५ एप्रिल रोजी कारवाई करून अवैधरित्या गौणखनिज वाहतुक करणारी दोन वाहने पकडली. सदरील वाहन चालकाकडे गौणखनिज वाहतुकीचा कोणताही परवाना आढळुन आला नाही.उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.वाहन क्र.एम.एच-३८-डी-७१७७ असून वाहन मालकाचे नाव राजेंद्र पंडितराव देशमुख (रा. हिंगोली) असुन सदरील वाहन चालकाचे नाव गणेश किसन कांबळे (रा.केसापूर) असे आहे. या वाहनात ४ ब्रास अवैध रेती आढळुन आली असून याप्रकरणी ३ लाख १२ हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.वाहन क्र.एम.एच.-३८-डी ९०९९ सदरील वाहन मालकाचे नाव प्रताप विजय चौंदने (रा. हिंगोली) असुन सदरील वाहनचालकाचे नाव उत्तम गोविंद सानप (रा. सायाळा) असे आहे. या वाहनात ६ ब्रास अवैध रेती आढळून आली.त्यामुळे या वाहनावर ३ लाख ६८ हजार रुपयाची दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.या कार्यवाहीत ४० लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या सूचनेनुसार पथकातील मंडळ अधिकारी, खंदारे, अल्लाबक्ष तसेच तलाठी प्रदीप इंगोले, बेले, सय्यद, भालेराव, बाबर, पोटे व वाहनचालक सुनील मरळे आदींनी केली.
अवैध गौणखनिज; महसूल पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:00 IST