रस्त्यावर फिराल तर हाेणार कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:29 AM2021-04-17T04:29:14+5:302021-04-17T04:29:14+5:30

आज पोलीस अधीक्षक राकेश कलासागर हे स्वत: रस्त्यावर उतरले होते. सहायक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे ...

If you walk on the road, you will pass the corona test | रस्त्यावर फिराल तर हाेणार कोरोना चाचणी

रस्त्यावर फिराल तर हाेणार कोरोना चाचणी

Next

आज पोलीस अधीक्षक राकेश कलासागर हे स्वत: रस्त्यावर उतरले होते. सहायक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांनी बाजारपेठेत विविध भागांत पाहणी केली, तर अग्रसेन चौकात स्वत: उभे राहून या ठिकाणाहून जाणाऱ्या प्रत्येकाची अँटिजन चाचणी करण्यास भाग पाडले. ऑटो, दुचाकी, पायी जाणाऱ्यांना या ठिकाणी अडविले जात होते, तर या सर्वांना आधी चाचणी केल्याशिवाय येथून पुढे जायचे नाही, असे सांगितले जात होते. त्यामुळे आता विनाकारण फिरणाऱ्यांना चाप बसण्याची शक्यता आहे.

गांधी चौक भागात चाचणी केंद्र हवे

अग्रसेन चौकातच ही चाचणी करून भागणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौक, म.गांधी चौक या भागात ही चाचणी करण्यासाठी केंद्र उभारले पाहिजे. अग्रसेन चौकात चाचणी होत असल्याचे कळताच, या पर्यायी मार्गांचा वापर अनेक जण करताना दिसत होते. त्यामुळे या ठिकाणीही चाचणी केल्यास लोकांचे फिरणे कमी होईल, शिवाय जे बाधित असताना बाहेर फिरत आहेत, अशांपासून संसर्गाचा धोका कमी होईल.

विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

जे लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत, अशांवर पोलीस कारवाई करणार आहेत, शिवाय जे फिरत आहेत, अशांची चाचणी करून त्यात कोणी बाधित आढळले, तर त्यांना रुग्णालयात पाठविले जाईल. संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी हे करावे लागत आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिली.

Web Title: If you walk on the road, you will pass the corona test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.