शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीला दगाफटका केल्यास भाजपची नांदेडची जागा पाडू; शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला इशारा

By विजय पाटील | Updated: April 2, 2024 13:34 IST

महायुतीकडून हेमंत पाटील यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून हिंगोली लोकसभेतील भाजपचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विराेध केला. त्यामुळे महायुतीचे बिनसले आहे.

हिंगोली : हिंगोली लोकसभेच्या जागेसाठी महायुतीकडून हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्याने हिंगोली मतदारसंघातील भाजप आमदार आणि पदाधिकारी पाटील यांच्याबाबतीत सर्व्हे निगेटिव्ह असल्याचे आकांडतांडव करीत आहेत; परंतु हिंगोलीत शिवसेनेच्या उमेदवाराला काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर नांदेडची जागा पाडल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सोमवारी नांदेडात झालेल्या बैठकीत दिला.

महायुतीकडून हेमंत पाटील यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून हिंगोली लोकसभेतील भाजपचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विराेध केला. त्यामुळे महायुतीचे बिनसले आहे. त्याचे पडसाद नांदेड जिल्ह्यातही उमटले आहेत. सोमवारी शिवसेनेच्या तिन्ही जिल्हाप्रमुखांनी एका हॉटेलमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये या पदाधिकाऱ्यांनी भाजपाच्या भूमिकेवर सडकून टीका केली. हेमंत पाटील हे विद्यमान खासदार आहेत. मतदारसंघात त्यांनी जी कामे केली आहेत, त्याच्या जोरावर त्यांना तिकीट मिळाले आहे; परंतु आता भाजपवाले म्हणताहेत की, सर्व्हे निगेटिव्ह आले. कोणी केला सर्व्हे अन् कशासाठी? आमच्या जागेचा सर्व्हे करायला भाजपवाल्यांना कुणी सांगितले? भाजपाची यादी जाहीर झाल्यानंतर आम्ही कोणीच विरोध केला नाही.

प्रताप चिखलीकरांच्या स्वागताला, त्यांच्या प्रचाराला आम्ही पुढे होतो. युती धर्माचे आम्ही पालन करीत आहोत; परंतु शिस्तीचा पक्ष म्हणून मिरविणाऱ्या भाजपाला त्याचा विसर पडला का? पक्षश्रेष्ठींनी भाजपच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांना समज का दिली नाही? पक्षश्रेष्ठींना या बाबी कळत नाहीत का? असा सवालही संतप्त शिवसैनिकांनी उपस्थित केला. राज्यभरात लाेकसभेच्या शिवसेनेच्या अनेक जागांवर भाजप दावा करीत आहेत. एकप्रकारे शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे. युती धर्म म्हणून समोर यायचे अन् पाठीत खंजीर खुपसायचे काम भाजपाकडून सुरू आहे; परंतु त्यांच्या या नीतीचा फटका त्यांना राज्यभरात बसू शकतो. नांदेडातही महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार आम्ही करणार नाही, अशी भूमिका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर, उमेश मुंढे, गंगाधर बडुरे, प्रल्हाद इंगोले, अशोक उमरेकर, कांचन पुरोहित, वनमाला राठोड आदींची उपस्थिती होती.

विधानसभेलाही केला होता दगाफटकाविधानसभा निवडणुकीत दक्षिण मतदारसंघातून राजश्री पाटील या महायुतीच्या उमेदवार असताना भाजपने त्यावेळी दगाफटका केला होता. राजश्री पाटील यांच्याविराेधात भाजपतील पदाधिकारी अपक्ष रिंगणात उतरला होता. त्यामुळे राजश्री पाटील यांचा पराभव झाला होता. आता भाजप तशाच पद्धतीने डावपेच आखत आहे, असा संताप व्यक्त केला.

शिंदेकडे देणार पदांचे राजीनामेहिंगोलीत हेमंत पाटील यांच्याऐवजी दुसरा उमेदवार दिल्यास नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी राजीनामे देतील. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त करतील. जोपर्यंत हिंगोलीच्या जागेचा निर्णय होणार नाही, तोपर्यंत नांदेडातील महायुतीच्या उमेदवाराचा प्रचारही करणार नसल्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४HingoliहिंगोलीNandedनांदेड