हिंगोली : वसमत तालुक्यात वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान झाले आहे. यात शंभरहून अधिक पक्षी मृत्यूमुखी पडले आहेत. तालुक्यातील हयातनगर व परिसरात शनिवारी मध्यरात्री वादळी वारे व पावसाने धुमाकूळ घातला. परिसरातील विजेचे खांब, झाडे कोसळली. घरांवरील पत्रे उडाली. यामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. विजेचे खांब आणि झाडे रस्त्यात पडल्याने पडल्याने रहदारी विस्कळीत झाली आहे. तसेच शंभरहून अधिक पक्षी यामुळे मृत्युमुखी पडले आहेत.
वसमत तालुक्यात वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान, शेकडो पक्षी मृत्युमुखी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2018 11:01 IST