शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

HSC Exam: सीसीटीव्ही बंद करून शिक्षकानेच पुरविली कॉपी; वसमतमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 11:43 IST

सीसीटीव्ही बंद करून ३७ मिनिटं चालला 'कॉपी'चा खेळ! वसमत शहर पोलिसांकडून तपास सुरू

- इस्माईल जहागीरदारवसमत (हिंगोली): बारावीच्या परीक्षेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी शिक्षण विभागाने कडक पावले उचलली असतानाच, वसमत येथील केंब्रिज कॉलेजमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका शिक्षकाने चक्क सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून विद्यार्थ्यांना गाईडमधील उत्तरे सांगितल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अज्ञात शिक्षकाविरुद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

वसमत शहरातील केंब्रिज कॉलेजमध्ये १२ वीच्या परीक्षेसाठी केंद्र आहे. ११ फेब्रुवारी रोजी हिंदी विषयाचा पेपर सुरू असताना, दुपारी १२:३६ ते १:१३ या वेळेत एका शिक्षकाने परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेरे जाणीवपूर्वक बंद केले. त्यानंतर, नियमांचे उल्लंघन करत विद्यार्थ्यांना गाईडमधील उत्तरे वाचून दाखवली आणि कॉपी करण्यास प्रत्यक्ष मदत केली.या गैरप्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओची दखल घेत शिक्षण विभागाने तातडीने चौकशी सुरू केली.केंद्र संचालक गुलाबराव रामराव नलगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता संबंधित शिक्षकाविरुद्ध अनुचित मार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. 

गटशिक्षणाधिकारी सतीश कास्टे यांनी या घटनेचा सविस्तर अहवाल तयार करून जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे पुढील कारवाईसाठी पाठवला आहे."परीक्षा मंडळाच्या नियमानुसारच परीक्षा घेतल्या जाव्यात, गैरप्रकार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही," असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. परीक्षेतील पारदर्शकता धोक्यात आणणाऱ्या या कृत्यामुळे आता त्या संबंधित शिक्षकावर काय कडक कारवाई होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : HSC Exam: Teacher Caught Helping Students Cheat by Turning off CCTV

Web Summary : In Vasmat, a teacher at Cambridge College turned off CCTV cameras and helped students cheat during the HSC exam. A police case has been registered, and the education department is investigating the matter, emphasizing that such misconduct will not be tolerated to ensure transparency.
टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाHingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी