शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या कशी करावी? यूट्यूबवर पाहत युवकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 22:20 IST

पोलिसांनी युवकाचा मोबाईल तपासला असता युट्यूबवर आत्महत्या कशी करावी? कोणत्या प्रकारामुळे विनात्रास मृत्यू येतो? याची पाहणी केल्याचे युट्यूब हिस्ट्रीतून स्पष्ट झाले आहे.

गंगाधर पांडुरंग सितळे -डोंगरकडा (जि. हिंगोली) - कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील १६ वर्षीय बेपत्ता युवकाचा मृतदेह डोंगरकडा उपबाजारपेठेच्या टिनशेडच्या खोलीत गळफास घेतलेल्या स्थितीत १२ ऑक्टोबर रोजी दुपारी आढळून आला. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्याची प्रक्रीया सुरू होती. दरम्यान, पोलिसांनी युवकाचा मोबाईल तपासला असता युट्यूबवर आत्महत्या कशी करावी? कोणत्या प्रकारामुळे विनात्रास मृत्यू येतो? याची पाहणी केल्याचे युट्यूब हिस्ट्रीतून स्पष्ट झाले आहे.

प्रशांत दिगंबर मोरे (वय १६ वर्षे, रा. डोंगरकडा) असे मृतदेह आढळलेल्या युवकाचे नाव आहे. प्रशांत मोरे हा डोंगरकडा येथे एका महाविद्यालयात इयत्ता अकरावी वर्गात शिक्षण घेत होता. मात्र मागील काही दिवसांपासून तो अस्वस्थ होता. २१ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून तो बेपत्ता झाला होता. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात नोंदही घेण्यात आली होती. पोलीस व नातेवाईक त्याच्या शोधात असतानाच बुधवारी दुपारी डोंगरकडा येथील उपबाजारपेठेच्या टिनपत्राच्या खोलीत प्रशांतचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार शेख बाबर, सय्यद शाहेद, प्रभाकर भोंग, अमोल अडकिने यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तपासात सदर मृतदेह प्रशांत मोरे याचा असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद आतकुरकर, प्रशांत स्वामी, बळीराम वाघमारे यांनी शवविच्छेदन केले.आत्महत्या कशी करावी? युट्यूबवर केले सर्च

दरम्यान, प्रशांत याने घर सोडण्यापूर्वी मोबाईल घरीच ठेवला होता. बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता युट्यूबवर आत्महत्या कशी करावी? कोणत्या प्रकारे आत्महत्या केल्याने त्रास कमी होतो? आदी माहिती सर्च केल्याचे पोलिसांना आढळले. त्यावरून पोलीस तपास करीत आहेत.

 

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliceपोलिसYouTubeयु ट्यूब