शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

रुग्णालये, आश्रमशाळांचा घेतला धांंडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:13 IST

विधानसभा सदस्यांच्या गठीत आश्वासन समितीद्वारे आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालय, अंगणवाडी, गोटेवाडी येथील आदिवासी आश्रमशाळा, येलकी येथील अंगणवाडीची पाहणी करण्यात आली. आमदार, अधिकारी यांच्या समितीद्वारे या पाहणी बाबतचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : विधानसभा सदस्यांच्या गठीत आश्वासन समितीद्वारे आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालय, अंगणवाडी, गोटेवाडी येथील आदिवासी आश्रमशाळा, येलकी येथील अंगणवाडीची पाहणी करण्यात आली. आमदार, अधिकारी यांच्या समितीद्वारे या पाहणी बाबतचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात येणार आहे.महाराष्टÑ शासनाच्या वतीने विधानसभेची आश्वासन समितीने कळमनुरी तालुक्यातील आरोग्य महिला व बालविकास, आदिवासी आश्रमशाळा या केंद्राची पाहणी केली. वसमतचे आ. डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली समितीत आ. तान्हाजी मुटकुळे, आ. प्रकाश कातर्पेकर, आ. काशिराम पावरा, अव्वर सचिव जयवंत राणे, सहा. कक्ष अधिकारी विजय कदम, राजेश राणे, प्रतिवेदक सतीष भोगल, विठ्ठल खर्च यांचा समावेश आहे. या समितीने दुपारी ३.३० वाजता आखाडा बाळापूर येथील अंगणवाडीची पाहणी केली. त्यानंतर हा ताफा बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मंगेश टेहरे, बाह्य संपर्क अधिकारी डॉ. गोपाळ कदम, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देशमुख, डॉ. सतीश रुणवाल, डॉ. सुकळीकर, डॉ. नरवटे, डॉ. नाकाडे, डॉ. राजेश कत्रुवार, डॉ. खुडे यांच्यासह अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. यावेळी समितीने रुग्णालयातील सोयी-सुविधांची माहिती घेतली. काही कागदपत्रे तपासली, रुग्णांशी संवाद साधला. त्यानंतर गोटेवाडी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेची पाहणी केली. वर्गखोल्या, पिण्याच्या पाण्याची सुविधा, गरम पाणी, जेवणाची सोय याबाबत विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. त्यानंतर येलकी येथील अंगणवाडीचीही पाहणी केली. या पाहणीचा अहवाल विधानसभेत सादर करणार असल्याचे समितीप्रमुख डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी सांगितले.ग्रामीण रुग्णालय चकचकीत, कर्मचारीही हाऊसफुल्लबाळापूरचे ग्रामीण रुग्णालयात प्रथमच चकचकीत करण्यात आले. खुद्द जिल्हा शल्यचिकित्सक व सर्वच अधिकारी जातीने हजर राहून प्रत्येक विभाग अपडेट झाला की नाही याची खातरजमा करून घेत होते. त्यामुळे नियमित व परिपुर्ण कर्मचारी नसतानाही आज मात्र रुग्णालयात कर्मचारी वर्ग हाऊसफुल्ल होते.नाय.. नो.. नेव्हर..रुग्णालयात तीन वर्षापासून वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त होती. पण समिती येणार असल्याने दोन दिवसांपुर्वीच तीनही वैद्यकीय अधिकाºयांची पदे भरलीत. त्यामुळे समितीने कर्मचारी- अधिकारी पूर्ण असल्याचे सांगत प्रत्येक प्रश्नाला हो चाच पाढा गायला. कोणत्याच बाबी नाही म्हणून सांगितल्या नाहीत. त्यामुळे समिती अध्यक्ष डॉ. मुंदडा यांनीही आश्चर्य व्यक्त केले. आरोग्य विभागाचे नाय... नो... नेव्हरचा पाढा किती दिवस टिकतो, हे कळेलच पण सध्या तरी त्यांचा होकार सत्कारणी लागला.आदिवासी प्रकल्पास भेटदरम्यान, आश्वासन समितीच्या वतीने आदिवासी प्रकल्प कार्यालय कळमनुरी येथेही भेट देण्यात आली. या कार्यालयात आश्रमशाळांसह या प्रकल्पातर्फे राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांची माहिती विचारण्यात आली. प्रकल्प अधिकारी विशाल राठोड यांनी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमही सांगितले.दर्शनासाठी घाई : पाहणीत मन रमेनाया आश्वासन समितीमधील मुंबईच्या सदस्यांना अंगणवाडी, रुग्णालय पाहणी करण्यात फारसा रस वाटला नाही. पाहणी करून शासनाला सुचना, दुरूस्ती, बदल सुचविण्यासाठी ही समिती असली तरी गांभिर्याने पाहणी करण्याऐवजी औंढा येथील नागनाथाचे दर्शन करून देवगिरी पकडण्यासाठी ते घाई करतहोते. थातूर-मातूर पाहणी करत उपचार पुर्ण करत होते व चला निघाचा सुर आळवित होते. पण समिती अध्यक्ष डॉ. मुंदडा व आ. मुटकुळे मात्र बारकाईने समस्या जाणून घेत होते. त्या कशा सोडवायच्या याचाही ते विचारविनिमय करीत होते.समिती सदस्य आरोग्य सुविधा, लाभार्थी, कागदपत्रे यांची पाहणी करत होते. तर आ. मुटकुळे मात्र स्वच्छतागृह, बाह्यरुग्ण विभागाची स्वच्छता अशी स्वच्छतेची पाहणी करत होते. ते खºया अर्थाने स्वच्छतेचे पाईक दिसले.