शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

‘श्रीं’च्या दर्शनासाठी हिंगोलीत अलोट गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:56 AM

नवसाला पावणारा गणपती म्हणून हिंगोली येथील श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची ओळख सर्वदूर आहे. राज्य परराज्यातून गणरायाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी भाविक हिंगोलीत येतात. यावर्षीही संस्थान व पोलीस प्रशासनातर्फे श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार याची काळजी घेतली जात आहे. गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही, जागो-जागी पोलीस बंदोबस्त वाहतूक शाखेचे पोलीस तैनात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नवसाला पावणारा गणपती म्हणून हिंगोली येथील श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची ओळख सर्वदूर आहे. राज्य परराज्यातून गणरायाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी भाविक हिंगोलीत येतात. यावर्षीही संस्थान व पोलीस प्रशासनातर्फे श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार याची काळजी घेतली जात आहे. गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही, जागो-जागी पोलीस बंदोबस्त वाहतूक शाखेचे पोलीस तैनात आहेत.हिंगोली येथे श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिराकडे दर्शनासाठी जाणाºया भाविकांच्या सध्या रांगा लागत आहेत. अनंत चर्तुदशीच्या दिवशी दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविकांच्या रांगा लागतात. त्यामुळे पोलीस प्रशासन व संस्थानकडून नियोजन करण्यात आले आहे. येणाºया भाविकांना शिस्तीत रांगेत उभे राहून दर्शन व्हावे, या उद्देशाने नियोजन करण्यात आले आहे. शिवाय पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मंदिर संस्थानच्या वतीने मोदक वाटप केले जाणार आहेत. २ लाख ५१ हजार मोदकांचे वाटप होणार आहे. भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढत चालली आहे. भक्तीमय वातावरणात श्रींच्या दर्शनासाठी महिला, पुरूष मुलांबाळासह हिंगोलीत येत आहेत.‘वाहने रामलीला मैदानात उभी करा’श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती दर्शनासाठी बाहेरून येणाºया भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे बाहेरून येणारी वाहने हिंगोली शहरातील रामलीला मैदान येथे पार्किंग करावी, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोनि सुडके यांनी केले. शिवाय भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी चौका-चौकात वाहतूक शाखेचेपोलीस कार्यरत आहेत. आवश्यक ठिकाणी लोखंडी गेट उभी केली आहेत. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, वाहतूक संदर्भात काही समस्या असतील तर वाहतूक शाखेचे पोलीस किंवा अधिकाºयांशी संपर्क करावा, असेही ते म्हणाले.श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणरायाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक हिंगोलीत येतात. येणाºया भाविकांसाठी यावर्षीपासून संस्थानतर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.पोलीस अधीक्षकांकडून पाहणी४गणेशोत्सव सणानिमित्त हिंगोली शहरात पोलीस प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हिंगोली शहरातील गड्डेपीर गल्लीतील श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. सध्या भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागत आहेत. शेवटच्या दिवशी हिंगोलीत भाविकांची अलोट गर्दी होते. भक्तीमय वातावरणात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घेत पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.जागो-जागी कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. २० सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर परिसराची पाहणी केली. भाविकांच्या रांगा कोठून लागत आहेत, दर्शनानंतर भाविक कोणत्या मार्गाने बाहेर पडणार, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत किंवा बंद आहेत. संस्थानकडून भाविकांच्या सोयीसाठी काय-काय उपाययोजना केल्या आहेत. यासह विविध बाबीकडे त्यांनी लक्ष केंद्रीत करीत पाहणी केली. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून संबधित पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना कडक सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. भाविकांनी शांततेत दर्शन घ्यावे. अडचणी किंवा समस्या उदभवल्यास पोलिसांना तात्काळ संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. यावेळी हिंगोली शहर ठाण्याचे पोनि उदयसिंग चंदेल, वाहतूक शाखेचे पोनि सुडके, यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मंदिर परिसराची पाहणी करताना संस्थानचे दिलीप बांगर व रमाकांत मिस्कीन, घन, मंत्री, मुंदडा व संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सवानिमित्त पोलीस प्रशासनाकडून दिवसा, रात्रीला पोलिसांची व्हॅन शहरासह ग्रामीण भागात गस्त घालत आहे. चौक व सार्वजनिक ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.सीसीटीव्ही कॅमेरे, सभामंडप४भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाातून मंदिर परिसरात संस्थानच्या वतीने सीसीटीव्ही कॅमरे बसविले आहेत. भाविकांना रांगेत शांततेत दर्शन घेता यावे, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरात भव्य सभामंडप उभा करण्यात आला आहे. भाविकांना विसावा मिळावा, तसेच दर्शनावेळी धावपळ होऊ नये यासाठी संस्थानकडून नियोजन केले जात आहे. आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी धडपड केली जात आहे, असे संस्थानचे सचिव दिलीप बांगर यांनी सांगितले. शिवाय मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी पोलीस अधिकारी कर्मचाºयांची संख्या वाढविण्यात येणार आहे.४गणेशोत्सव काळात शहरासह ग्रामीण भागात पोलीस गस्त सुरू आहे. पेट्रोलिंगदरम्यान कोणी दारू पिऊन वाहन चालविताना आढळून आल्यास तत्काळ गुन्हा दाखल केला जात आहे. शिवाय वाहतूक शाखेकडूनही वाहनांच्या वेगमर्यादेवर नियंत्रण आणले जात आहे. सार्वजनिक ठिकाणावरून वाहने वेगाने जात असल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जात आहे.नगरपालिकेकडून पथदिवे दुरूस्ती४गणेशोत्सवानिमित्त हिंगोली शहरातील नगरपालिकेकडून पथदिव्यांची दुरूस्ती केली जात आहे. ज्या ठिकाणचे पथदिवे नादुरूस्त आहेत त्याची दुरूस्ती करण्याचे काम गुरूवारी दिवसभर सुरू असल्याचे दिसून आले. शहरासह अनेक प्रभाागातील पथदिवे नादुरूस्त आहेत. त्यामुळे परिसरात अंधार होत आहे.४महावितरणकडूनही वीजपुरवठा अचानक खंडित होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८