हिंगोली: शहरात १२ हजार ७०४ नळधारक असून, त्यांनी नगर परिषदेचे तीन कोटी ३७ लाख ३० हजार ५६४ रुपये थकविले आहेत. त्यामुळे कोरोना काळातही मार्चएंडचे उद्दिष्ट पूर्ण होते की नाही हा प्रश्न नगर परिषदेला पडला आहे. एवढे असतानाही शिलेदार जिवाची पर्वा न करता थकबाकी नळधारकांच्या दारावर जात आहेत.
नगर परिषदेने वसुलीसाठी तीन झोनची स्थापना केली असून, यासाठी पाच ते सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. वारंवार सूचना करूनही नळधारक पैसे भरत नसल्यामुळे हा बाकीचा आकडा फुगला आहे. नळाची बाकी ठेवण्यात शहरातील काही शासकीय कार्यालयेही मागे राहिले नाहीत.
नगर परिषदेने वसुलीकरिता तीन झोन स्थापन केेले आहेत. पहिल्या झोनमध्ये ८२ लाख ४३ हजार ८७५ थकबाकी राहिली असून, ३८ लाख ४१ हजार ५७० रुपये वसूल केले आहेत. दुसऱ्या झोनमध्ये ९३ लाख ११ हजार ८१० थकबाकी राहिली असून, २८ लाख ६९ हजार ६४५ रुपये वसूल झाले आहेत, तर तिसऱ्या झोनमध्ये ६४ लाख ९९ हजार ५०० थकबाकी राहिली असून, २७ लाख ६१ हजार ६६५ रुपये वसूल झाले आहेत. याचबरोबर शहरातील काही शासकीय कार्यालयांकडे नळपट्टीची ९६ लाख ७५ हजार ३७९ थाकबाकी राहिली असून, १९ लाख २ हजार ५३५ रुपये नगर परिषदेकडे जमा केले आहेत.
कोरोना आज आहे, उद्या नाही
वसुली तर होणारच....
कोरोना आजार आज ना उद्या संपणार आहे. जिल्हा प्रशासन त्यासाठी प्रयत्नही करीत आहे. वसुली झाली तरच कर्मचाऱ्यांचा पगार निघणार आहे. यासाठी पाणीपुरवठा अभियंता गजानन हिरमेठ, डी. पी. शिंदे, पंडित मस्के, गजानन आठवले, एजाज पठाण, उतम टेमकर, विजय इंगोले हे सर्व कर्मचारी मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वसुलीसाठी प्रयत्न करीत आहेत.
पंडित