शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीकरांचे पाणी पळविण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:09 IST

जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर होण्याची वेळ येताच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सापळी धरणातून ३३ दलघमी पाणी उपलब्ध केल्याने नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष निर्माण होईल, अशी भीती दाखवत विरोध सुरू केला. हिंगोलीकरांनी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केले.

ठळक मुद्देमुटकुळे यांचा आरोपसिंचन अनुशेषाला चव्हाणांचा खोडा

हिंगोली : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर होण्याची वेळ येताच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सापळी धरणातून ३३ दलघमी पाणी उपलब्ध केल्याने नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष निर्माण होईल, अशी भीती दाखवत विरोध सुरू केला. हिंगोलीकरांनी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केले.भाजपा कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर उपस्थित होते. आ.मुटकुळे म्हणाले, मी निवडून आल्यानंतर मागील चार वर्षांपासून हिंगोलीच्या सिंचन अनुशेषासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करत आहोत. या त्यामुळे राज्यपालांनी १५ हेक्टरच्या सिंचन अनुशेषाला मंजुरी दिली आहे. सिंचन अनुशेषाच्या उपाययोजना सुरू होत असताना पाणी उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण झाली होती. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी पाठपुरावा केल्याने उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाची फेररचना करण्यावर शिक्कामोर्तब झाले. यासाठी मुंबई व नागपूर येथे झालेल्या बैठकीनंतर सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळाले. यानंतर सापळी धरणाचे पुनर्विलोकन व उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या फेरनियोजनासाठी झालेल्या बैठकीत जलविज्ञान प्रकल्प नाशिक यांनी केलेल्या अभ्यासानुसार सापळी धरणाच्या १९९ दलघमी मान्यताप्राप्त नियोजित पाणी वापरापैकी हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन अनुशेष निर्मूलनार्थ आवश्यक ३३ दलघमी आता दिले. तर सापळी धरणाच्या वरच्या बाजूस यापूर्वी झालेल्या २८.४३ दलघमी अतिरिक्त पाणी वापरामुळे एकूण ६१.४३ दलघमीची तूट निर्माण होत असल्याने १९९ दलामी वापरातून कमी करून उक्त प्रयोजनार्थ उपलब्ध करून घेण्याबाबत तत्वत: मान्यता १८ मे रोजी देण्यात आली. यामुळे सिंचन अनुशेष दूर होण्यासाठी मोठी मदत होत होती. मात्र माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सापळी धरणातून ३३ दलघमी पाणी उपलब्ध करून देण्यास विरोध दर्शविला. यामुळे नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात सिंचन अनुशेष निर्माण होण्याची शक्यता असल्याने पाणी उपलब्धता रद्द करण्याची मागणी केली. इसापूर व सापळी धरणाच्या उर्ध्व बाजूस कोणत्याही नवीन प्रकल्पास भविष्यात पाणी उपलब्धता न करून देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाई