शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 17:23 IST

अपघातानंतर टिप्परचा चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे

- इस्माईल जहागीरदारवसमत : भरधाव टिप्परने डिव्हायडर तोडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला उभ्या ऑटोला धडक दिली. त्यानंतर त्याच ऑटोवर टिप्पर उलटल्याने त्याखाली दबून दोघेजण ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना वसमत शहरातील कवठा रोडवरील मदिना चौकात ३ मे रोजी दुपारी १:१५ वाजेच्या सुमारास घडली.

परभणीकडून माती घेऊन निघालेला भरधाव टिप्पर (एम.एच.२० सी.टी.९७९७) वसमत शहराजवळील विटभट्टीकडे जात होता. हा टिप्पर कवठा रोडवरील मदिना चौकात येताच चालकाचे नियंत्रण सुटले आणि टिप्पर डिव्हायडर तोडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला पिण्याच्या पाण्याची बाॅटल घेण्यासाठी थांबलेल्या प्रवासी ऑटो (एम.एच.३८ डब्ल्यू ०१९७) वर आदळला व त्याच ऑटोवर उलटला. टिप्पर आणि मातीखाली ऑटोतील प्रवासी दबल्या गेले. या अपघातात यास्मिन बेगम मोईन खान (२८, रा.मनमाड), शोएब खान जलील खान (१६, रा.कुरूंदा ता.वसमत) हे दोघे जागीच ठार झाले. तर अफ्फान मोईन खान (५), आझाद मोईन खान (७, दोघे रा.मनमाड), संतोष असाराम खनके (४०, रा.श्यामनगर, वसमत) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर वसमत येथील उपजिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून नांदेडला हलविण्यात आले. तर अपघातानंतर टिप्परचा चालक घटनास्थळावरून पसार झाला.

क्रेनच्या मदतीने टिप्पर बाजुला काढलाटिप्पर ऑटोवर उलटल्याने प्रवासी त्याखाली दबले गेले. त्यांना बाहेर काढणेही शक्य होत नव्हते. त्यामुळे या ठिकाणी क्रेनची मदत घेत उलटलेला टिप्पर बाजुला काढण्यात आला. त्यानंतर प्रवाशांना बाहेर काढले. घटनास्थळी नागरिकांनी संताप व्यक्त केला. यादरम्यान आमदार राजू नवघरे यांनी घटनास्थळी भेट देत जमवाला शांत केले. उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे, शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, सहायक पोलिस निरीक्षक बालाजी महाजन, इम्रान कादरी, जोंधळे यांनी भेट दिली. घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत वसमत शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, ऑटोतील प्रवासी हे वसमत येथे कार्यक्रमासाठी निघाले जात होते, अशी माहिती आहे. परंतु, कार्यक्रमस्थळी पोहोचण्याअगोदरच काळाने घाला घातला.

घटनास्थळी आक्रोश...माती वाहतूक करणारा भरधाव हायवा टिप्पर डिव्हायडर तोडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला येत ऑटोवर उलटला. मदिना चौक हे गर्दीचे ठिकाण आहे. काही क्षणातच झालेल्या या अपघातामुळे एकच गोंधळ उडाला होता. घटनास्थळी मदतीसाठी पोलिस प्रशासनासह शेकडो नागरिक धावले. या ठिकाणी मयताच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. टिप्पर चालक आणि मालकाविरूद्ध कारवाईची मागणी होत होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीAccidentअपघात