हिंगोली : शहरातील खटकाळी भागात एका मुख्याध्यापक संतोष बबनराव कढणे यास २८ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५ मार्च रोजी रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील मधोमती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष बबनराव कढणे हे घरभाड्याच्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम २९,०६० रुपयांच्या लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. तक्रारदाराला ५८,१२० रुपये वार्षिक घरभाडे पगारात मिळाले होते. या रकमेच्या ५० टक्क्यांप्रमाणे २९,०६० रुपयांची मागणी मुख्याध्यापक संतोष कढणे यांनी केली. ही रक्कम दिली नाही तर तक्रारदार मुख्यालयात राहत नाहीत, असा अहवाल शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना पाठवून घरभाडे भत्ता बंद करेन, असे मुख्याध्यापक संतोष कढणे म्हणाले, असेही तक्रारीत नमूद केले.
या तक्रारीवरुन २७ फेब्रुवारी रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर ५ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. त्यावेळी मुख्याध्यापक संतोष कढणे यांनी शासकीय पंचासमक्ष २८ हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू यांच्या फिर्यादीवरून आरोपी संतोष बबनराव कढणे याच्याविरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईनंतर आरोपीच्या घरझडतीची प्रक्रिया वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू यांनी केली. पोलिस निरीक्षक सुलभा राऊत या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
Web Summary : A headmaster in Hingoli was arrested for accepting a ₹28,000 bribe. He demanded the money from a teacher to prevent the stoppage of house rent allowance. ACB laid the trap and caught him red-handed. Further investigation is underway.
Web Summary : हिंगोली में एक प्रधानाध्यापक को 28,000 रुपये की रिश्वत लेते हुए गिरफ्तार किया गया। उन्होंने एक शिक्षक से मकान किराया भत्ता रोकने से बचाने के लिए पैसे की मांग की थी। एसीबी ने जाल बिछाकर उसे रंगे हाथों पकड़ लिया। आगे की जांच चल रही है।