हिंगोलीत पुन्हा एटीएम मशीनसमोर रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:43 IST2018-01-10T00:43:27+5:302018-01-10T00:43:33+5:30
शहरातील एटीएम मशिनमध्ये पैसेच नसल्याने पुन्हा रांगा लावण्याची वेळ येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. आज अनेक बँकांच्या एटीएममध्ये पैसेच नसल्याने ग्राहक इतर बँकेतून पैसे काढताना दिसून येत होते.

हिंगोलीत पुन्हा एटीएम मशीनसमोर रांगा
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील एटीएम मशिनमध्ये पैसेच नसल्याने पुन्हा रांगा लावण्याची वेळ येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. आज अनेक बँकांच्या एटीएममध्ये पैसेच नसल्याने ग्राहक इतर बँकेतून पैसे काढताना दिसून येत होते.
नोटाबंदीनंतर अनेक दिवस एटीएम बंद राहिले होते. मध्यंतरी काही बँकांचेच एटीएम सुरू झाले. मात्र काही बँकांचे एटीएम बंद पडले ते पुन्हा सुरू झालेच नाहीत. एकीकडे कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात असल्याने दुसरीकडे एटीएमची संख्या घटत जात होती. मात्र चालू असलेले अनेक एटीएमही आता रोकड नसल्याने बंद राहात असल्याचे चित्र दिसून येत आहे. बँक आॅफ इंडिया, युनियन बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, एसबीआय शिवाजीनगर, विजया बँक, पीपल्स बँक आदी ठिकाणी हे चित्र होते. मात्र छायाचित्रे काढली म्हणून काहींनी नंतर त्यात रोकड टाकली आहे. काल तर केवळ एकाच ठिकाणी रोकड उपलब्ध होती.