हिंगोली पं.स. सभापती निवड ४ मे रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:29 IST2021-04-17T04:29:41+5:302021-04-17T04:29:41+5:30

यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी, हिंगोली यांना प्राधिकृत केले आहे. ते ४ रोजी सकाळी १० ते ...

Hingoli P.S. Election of Speaker on 4th May | हिंगोली पं.स. सभापती निवड ४ मे रोजी

हिंगोली पं.स. सभापती निवड ४ मे रोजी

यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी, हिंगोली यांना प्राधिकृत केले आहे. ते ४ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत पंचायत समिती हिंगोली कार्यालयाच्या सभागृहात नामनिर्देशनपत्रे स्वीकारतील. या विशेष सभेत पंचायत समिती सभापती पदासाठीची निवडणूक ही महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ व त्या अंतर्गत महाराष्ट्र जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समिती उपसभापती पदाचे आरक्षण व निवडणूक नियम १९६२ च्या तरतुदीनुसार घेण्यात यावी. पीठासीन अधिकारी यांनी उक्त पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना या विशेष सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी विहित नमुन्यातील नोटीस सदस्यांना वेळेत बजावणीसाठी विशेष दुतामार्फत व्यवस्था करावी आणि या बैठकीनंतर निवडून आलेल्या सभापती यांची नावे व पत्ता सभेच्या कार्यवृत्तांच्या प्रतीसह जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावे, असे आदेश दिले आहेत.

Web Title: Hingoli P.S. Election of Speaker on 4th May