शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

४ गुंठ्यात बहरलेली अफूची शेती उद्ध्वस्त; हिंगोली पोलिसांच्या कारवाईने माफियांचे धाबे दणाणले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 11:53 IST

वसमत तालुक्यात ४ गुंठ्यांतील अफूची शेती उद्ध्वस्त; ३.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

- इस्माईल जहागीरदार.वसमत: अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांनी आजवरची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने वसमत तालुक्यातील शिरळी येथे धाड टाकून तब्बल चार गुंठ्यांतील अफूची शेती नष्ट केली आहे.

हिंगोली जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात अफूची लागवड शोधून काढण्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी पदभार स्वीकारल्यापासून गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला असून, या कारवाईमुळे अमली पदार्थ माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.वसमत तालुक्यातील शिरळी शिवारात १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने छापा टाकून १ क्विंटल ७७ किलो ४५ ग्रॅम वजनाची अफूची झाडे.एकूण ३ लाख ५४ हजार ९०० रुपयांची जप्त केली व  प्रताप सुरेश नलगे (वय ४२, रा. शिरळी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात १७ फेब्रुवारी रोजी पहाटे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.तालुक्यात अफुची शेती बहरल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती यावरुन ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली,

"कोणाचीही गय केली जाणार नाही"या यशस्वी कारवाईनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, "जिल्ह्यात अफू, गांजा किंवा इतर कोणत्याही अमली पदार्थांची लागवड किंवा विक्री करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. अशा अवैध प्रवृत्तींविरुद्ध पोलीस दलाची धडाकेबाज मोहीम यापुढेही सुरूच राहील."

यांनी केली कारवाईसदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सपोनि शिवसांब घेवारे, सपोनि कारामुंगे, पोलीस अंमलदार भुजंग कोकरे, गजानन पोकळे, ज्ञानेश्वर गोरे, साईनाथ कंठे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, किशोर सावंत, संदीप टाक आणि साठे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

English
हिंदी सारांश
Web Title : Hingoli Police Destroy Opium Farm, Drug Mafia Shaken

Web Summary : Hingoli police destroyed a four-gunta opium farm in Shirli, arresting one. This significant action, led by SP Dr. Rohan, signals a crackdown on drug cultivation and trade in the district. Police warn zero tolerance for narcotics activities.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली