हिंगोलीत तलवारीचा धाक दाखवून घर लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:28 AM2021-03-08T04:28:19+5:302021-03-08T04:28:19+5:30

हिंगोली : तलवारीचा धाक दाखवून १२ ते १३ दरोडेखोरांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे दोन लाख २६ ...

Hingoli looted the house out of fear of the sword | हिंगोलीत तलवारीचा धाक दाखवून घर लुटले

हिंगोलीत तलवारीचा धाक दाखवून घर लुटले

Next

हिंगोली : तलवारीचा धाक दाखवून १२ ते १३ दरोडेखोरांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे दोन लाख २६ हजारांचा ऐवज लुटल्याची घटना ७ मार्चच्या पहाटेच्या सुमारास हिंगोली शहरालगत असलेल्या सुराणा नगरात घडली.

हिंगोली शहरालगत असलेल्या सुराणा नगरात एसआरपीएफ जवान आर.व्ही. त्रिमुखे यांचे घर आहे. सध्या त्यांचा भाऊ अमोल विठ्ठल त्रिमुखे तेथे राहतात. ७ मार्चच्या पहाटे २ ते २.३० च्या दरम्यान १२ ते १३ दरोडेखोर या भागात आले. यातील ७ ते ८ जणांनी अमोल त्रिमुखे यांच्या घराचे चॅनल गेटचे कुलूप तोडून आवारात प्रवेश केला. त्यानंतर घराच्या दरवाजाचे कडी, कोंडे तोडून घरात प्रवेश केला. दरवाजाच्या कडीकोंड्याचा आवाज आल्याने त्रिमुखे कुटुंबीयांना जाग आली. तोपर्यंत दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला होता. दरोडेखोरांनी अमाेल त्रिमुखे यांच्या आई, वहिणीला तलवारीचा धाक दाखवत त्यांच्या अंगावरील एक लाख ४१ हजारांचे सोन्या-चादींचे दागिने तसेच रोख ५५ हजार व ३० हजार रुपये किमतीचे चार मोबाइल, असा दोन लाख २६ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. दरम्यान, यातील ४ ते ५ चोरट्यांनी श्रीमुखे यांच्या शेजारील घराच्या दरवाजाच्या कड्या बाहेरून लावून घेत लक्ष ठेवले.

या घटनेची माहिती मिळताच पाेलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, सहा. पाेलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी व्ही.टी. वाखारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहायक पोलीस निरीक्षक बी.आर. बंदखडके, पोलीस उपनिरीक्षक बी.एच. कांबळे, जमादार संतोष वाठोरे, अशोक धामणे, रविकांत हरकाळ आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी श्वानपथक व ठस्से तज्ज्ञांनाही पाचारण करत, दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र श्वानाने घटनास्थळापासून काही अंतरापर्यंत माग काढला. याप्रकरणी अमोल विठ्ठल त्रिमुखे यांच्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नाेंदविला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बी.आर. बंदखडके करीत आहेत.

Web Title: Hingoli looted the house out of fear of the sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.