शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

HIngoli: बसमध्ये चढताना महिला प्रवाशाचे अडीच लाखांचे दागिने लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 13:57 IST

बसस्थानक बनले गैरसोयीचे, चोरीच्या घटना वाढू लागल्या

वसमत (जि. हिंगोली) : बसमध्ये बसत असताना एका महिला प्रवाशाच्या बॅगमधील अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना वसमत बसस्थानकात २ मे रोजी सकाळी १०:४५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

परभणी शहरातील सहकार नगरातील सुमित्रा संदीप पिंपरकर या बहिणीच्या लग्नासाठी अडीच वर्षांच्या मुलाला घेऊन माहेरी सेलू (ता. वसमत) येथे जाण्यासाठी वसमत बसस्थानकात उतरल्या होत्या, येथून त्या मुलाला घेऊन औंढाकडे जाणाऱ्या बसमध्ये बसत होत्या, यावेळी प्रवाशांची मोठी गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी सुमित्रा यांच्या गळ्यातील पर्स कापून त्यातील ३४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, ११ ग्रॅम वजनाचा नेकलेस, ८ ग्रॅम वजनाचे झुंबर असा एकूण २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने काढून घेतले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बसस्थानक परिसरात चोरट्यांचा शोध घेतला. मात्र चोरटे गर्दीचा फायदा घेत पसार झाले. याप्रकरणी सुमित्रा पिंपरकर यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. सहायक पोलिस निरीक्षक बी. जी. महाजन तपास करीत आहेत.

लाॅकरमधून काढले होते दागिनेबहिणीचे १० मे रोजी लग्न असल्याने सुमित्रा पिंपरकर यांनी बँक लाॅकरमध्ये सुरक्षित ठेवलेले सोन्याचे दागिने काढले होते. त्यानंतर त्या माहेरी सेलू गावाकडे निघाल्या होत्या. मात्र चोरट्यांनी दागिने लंपास केले.

बसस्थानक बनले गैरसोयीचेवसमतच्या नवीन बसस्थानकाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे तात्पुरता प्रवासी निवारा प्रवाशांसाठी उभारण्यात आला आहे. तात्पुरत्या शेडमध्ये प्रवाशांसाठी कोणतीच सुविधा नाही, त्यामुळे बसस्थानक गैरसोयीचे ठरत आहे. परिणामी चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली