शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यात ३0 मतदान केंद्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 23:06 IST

निकषापेक्षाही जास्त मतदारसंख्या झालेल्या मतदार केंद्रांची विभागणी करून नवीन मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ९७१ वरून १00१ मतदान केंद्र पोहोचल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : निकषापेक्षाही जास्त मतदारसंख्या झालेल्या मतदार केंद्रांची विभागणी करून नवीन मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ९७१ वरून १00१ मतदान केंद्र पोहोचल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.पुढच्या वर्षी लोकसभा-विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर नवीन मतदार नोंदणी व पुनरिक्षणाचा कार्यक्रम सुरू आहे. त्याचबरोबर मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, मतदारांना सुकर व्हावे, यासाठी योग्य मतदारसंख्या निश्चित करण्यासाठी ही विभागणी केली. हिंगोली जिल्ह्यात ग्रामीण भागात १४00 मतदारांमागे एक तर शहरी भागात १२00 मागे एक मतदान केंद्र देण्यात आले आहे. यापूर्वी काही मतदान केंद्रांवर तर सतराशेपेक्षाही जास्त मतदार झाल्याने मतदारांची अडचण होत होती. अशा ठिकाणी आता सुरळीतपणा येणार आहे.या नव्या निर्णयात हिंगोली विधानसभेअंतर्गत १३, वसमतअंतर्गत ८ तर कळमनुरीअंतर्गत ९ मतदान केंद्र वाढले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील २२ तर शहरी भागातील ८ मतदान केंद्र वाढले आहेत. याबाबतच्या सर्वेक्षणानंतर प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. त्याला मंजुरीही मिळाली असल्याने आता वाढीव मतदान केंद्रांवर शिक्कामोर्तब झाले आहे.पुनरिक्षण कार्यक्रमआता पुढील निवडणुकीपूर्वीचा बहुदा अंतिम मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम १ सप्टेंबर पासून सुरू होत आहे. यात १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबरदरम्यान पात्र नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकारणे, ३0 नोव्हेंबरपूर्वी हे दावे निकाली काढणे, डाटाबेसचे अद्ययावतीकरण करून पुरवणी याद्या ३ जानेवारीपर्यंत प्रसिद्ध करणे, ४ जानेवारीला अंतिम प्रसिद्धी देणे असा हा कार्यक्रम आहे.वसमत विधानसभा मतदार संघात आता ३२२ मतदान केंद्र राहणार असून २.८0 लाख मतदार आहेत. यात १.४६ लाख पुरुष तर १.३४ लाख स्त्री मतदार आहेत. कळमनुरी मतदारसंघात आता ३४५ मतदान केंद्र झाले असून मतदारसंख्या २.९४ लाख झाली. यात १.५५ लाख पुरुष तर १.३९ लाख स्त्री मतदारांचा समावेश आहे. हिंगोलीत ३३४ मतदान केंद्र राहणार असून २.९९ लाख मतदार आहेत. यात १.५७ लाख स्त्री तर १.४२ हजार पुरुष मतदार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीकर यांनी दिली.

टॅग्स :HingoliहिंगोलीElectionनिवडणूक